गाय, वासराला जखमी करणाऱ्यावर गुन्हा दाखल
*🛑गाय, वासराला जखमी करणाऱ्यावर गुन्हा दाखल*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०४*:-बागेत घुसलेल्या गुसंवर कोयत्याने हल्ला केल्याबाबत नफिस गौस पाटणकर (२९, नांदगाव तिठा) याच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरांचे मालक विशाल विलास मेस्त्री (३४, सोडवली-बोभाटेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना बोभाटेवाडी येथेच शनिवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली होती. फिर्यादीनुसार, विशाल यांनी आपली गाय व वासरू अशी दोन गुरे शनिवारी सकाळच्या सुमारास आपल्या जमिनीमध्ये चरायला सोडली होती. त्यानंतर विशाल कामासाठी अन्यत्र निघून गेले. दुपारच्या सुमारास त्यांना बोभाटेवाडी येथील शिरसाट यांच्या बागेत काम करणाऱ्या एका कामगाराचा फोन आला. विशाल यांची गाय व वासरू नजीकच्या नफिस पाटणकर याच्या बागेतून हळूहळू चालत शिरसाट यांच्या बागेत येऊन जखमी स्थितीत बसली आहेत, असे कामगाराने सांगितले. त्यानुसार विशाल यांनी शिरसाट यांची बाग गाठली. त्यांनी पाहिले असता गाय व वासरू यांच्या मागील उजव्या पायाला दुखापत झाली होती. विशाल विचारणा करण्यासाठी नफिस पाटणकर याच्या बागेत गेले. तेथे उपस्थित नफिस याने, ‘तुझी गुरे माझ्या बागेत येऊन कायम नुकसान करतात. आजही ती आली होती त्यांना मी कोयत्याने मारले’, असे सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

