क्राइमसावंतवाडी

राज्य उत्पादन शुल्क यांच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी तिघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी* *इन्सुली सात जांभळी येथे राज्य उत्पादन शुल्क अधिकार्‍यांना धडक देऊन केला होता पोबारा*

 

इन्सुली सात जांभळी येथे राज्य उत्पादन शुल्क अधिकार्‍यांना धडक देऊन केला होता पोबारा

 

सावंतवाडी,ता.२३: राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी त्या चौघा संशयीता विरोधात येथिल पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.आज बांदा पोलिसांनी अन्य दोघांना अटक केली.विठ्ठल संतोष चौगुले (वय २१) रा.चिपटेवाडी माजगाव आणि सालिम निसार नदाफ (वय २६) रा.बाहेरचावाडा सावंतवाडी यांचा समावेश आहे,तर या प्रकरणी अजय सुर्यकांत कवठणकर रा.ओटवणे हा अद्याप फरार आहे. दरम्यान काल ताब्यात घेण्यात आलेल्या तुषार तुळसकर याच्यासह तिघांनाही आज येथिल न्यायालयात हजर करण्यात आले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.याबाबबत अधिक माहीती,अशी इन्सुली सातजांभळी नाका येथे आपल्या सहकाऱ्यांसमवेत डयूटी बजावत असलेल्या पांडुरंग पाटील (वय ५३) या एक्साईजच्या अधिकाऱ्याला या चौघांनी धक्काबुक्की केली होती.तसेच गाडी ठोकरुन पळ काढला होता. या प्रकरणी पाटील यांनी बांदा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर काल सायंकाळी तुषार तुळसकर याला अटक करण्यात आली,तर रात्री उशिरा चौगुले व नदाफ या दोघांना अटक करण्यात आली.दरम्यान यातील कवठणकर हा फरार आहे.त्याचा शोध पोलिस घेत आहे.दरम्यान तिघांनाही येथिल न्यायालयात आज हजर करण्यात आले होते.यावेळी त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. याकामी ऍड स्वप्निल कोलगावकर यांनी काम पाहीले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!