माणगावात गोठ्याला आग, चार म्हशी गंभीर
*🟥 माणगावात गोठ्याला आग, चार म्हशी गंभीर*
*🟥 म्हशींना वाचविताना मालक गंभीर जखमी : गोठा आगीत खाक*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ,दि.१६*:-माणगाव-मळावाडी येथे गोव्याला आना लागून आतील चार दुभत्या म्हशी गमीर भाजत्त्याची घटना बुधवारी सकाळी दहा वाजता घडली. म्हशींना आगीपासून वाचविण्यासाठी त्यांना बाहेर काढत असताना मालक गोविंद लाडोबा कदम यांच्या हातावर जळालेला लाकडी वासा पडून त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर सावंतवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीचे कारण समजू शकले नाही. या घटनेत सुमारे दीड लाखाहून अधिक नुकसान झाले. वासरे गोठ्याच्या बाहेर बांधलेली असल्याने सुदैवाने ती बचावली. त्या गोठ्याच्या बाजूलाच इमारत होती. सुदैवाने तिला धोका पोहोचला नाही. ग्रामस्थांनी मदतकार्यात भाग घेतला.तेथील मळावाडी येथील शेतकरी गोविंद कदम यांचा शेती व दुग्ध व्यवसाय अहि. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या गुरांच्या गोव्याला आग लागली. आत त्यांच्या मालकीच्या म्हशी बांधलेल्या होत्या. आग लागल्याचे लक्षात येताच एकच तारांबळ उडाली. गोविंद कदम यांच्यासह त्यांच्या कुटुंबाने पाण्याचा मारा सुरू केला. तसेच आतील म्हशींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गोविंद कदम म्हशींना बाहेर काढण्यासाठी आत गेले असता, गोठ्याचा जळालेला लाकडी वासा त्यांच्या हातावर पडला. यात त्यांचा हात फॅक्चर झाला. त्यांना सावंतवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील ग्रामस्थांनीही धाव घेत मदतकार्यात भाग घेतला. परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. गोठा काही वेळातच जळून खाक झाला. आतील गुरांना बाहेर काढण्यात आले. परंतु चार म्हशी, गंभीररित्या भाजल्या. त्यांच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. हेमंत मेस्त्री, जयंत कुबल, अनिल कदम, पिळणकर व अन्य ग्रामस्थांनी मदतकार्यात सहभाग घेतला. माणगाव तलाठी विश्वास शेणवी यांनी पंचनामा केला. सरपंच मनीषा भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. गोविंद कदम यांची घरची परिस्थिती गरिबीची आहे. शेती व दुग्ध व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यांचे नुकसान झाले असून म्हशींच्या औषधोपचारासाठी खर्च येणार आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

