एडवोकेट बापू गव्हाणकर यांच्या वाढदिवसाला कोकण लाईव्ह टीम कडून देण्यात आल्या शुभेच्छा
प्रतिनिधी – प्रशांत मोरजकर
सावंतवाडी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीबांचे तारणहार नेहमी अन्यायाविरुद्ध पेटून उठून सत्याच्या बाजूने साथ देणारे वकील व कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चे कायदेशीर सल्लागार बापू गव्हाणकर यांना कोकण लाईव्ह ब्रेकिंग टीम ने पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
बापू गव्हाणकर गेली तीस वर्षे वकिली क्षेत्रात कार्यरत असून त्यांचे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अन्यायाविरुद्ध लढणारा वकील असे नाव आहे. त्यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मुख्य संपादक सीताराम गावडे ,कार्यकारी संपादक आनंद धोंड,जिल्हा जाहिरात व्यवस्थापक नाना धोंड, आंबोली प्रतिनिधी भाऊ पाटील ,केशव जाधव, आदी उपस्थित होते.

