शहरात विनाकारण फिराल तर कोरोना तपासणी करण्यास जावे लागेल सामोरे
सावंतवाडी, दि.२९:- शहरात कोरोना विषाणू साखळी तोडण्यासाठी आता प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.आज शहरात ११ वाजल्यानंतर विनाकारण फिरणाऱ्या लोकांना थांबवून कोरोना तपासणी करण्यात येत आहे. अचानक सुरू केलेल्या या कारवाईमुळे विनाकारण फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यावेळी तहसिलदार राजाराम म्हात्रे,प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, प्रभारी पोलिस निरीक्षक मेंगाडे,एपीआय जाधव,श्नी.कविटकर,श्नी.नाईक,श्नी.पास्ते आदी उपस्थित होते.

