कोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कुणकेरी लिंगाची वाडी येथे दत्त जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रम..

 

कोरोना ची नियमावली पाळून साजरा करण्यात येणार आहे हा उत्सव

प्रतिनिधी – प्रशांत मोरजकर

सावंतवाडी,कुणकेरी:- येथील दत्त मंदिर लिंगाचे वाडी दत्त जयंती निमित्त मंगळवार दिनांक २२ ते २९-१२-२०२० या कालावधीत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण व दत्त जन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे.
या कालावधीत ज्ञानेश्वरीचे २३ वे पारायण व मंगळवार दिनांक २२-१२-२०२० रोजी सकाळी ठीक आठ वाजता ह.भ.प. लक्ष्मण सावंत कुणकेरी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात होणार आहे.त्यानंतर २९-१२-२०२० रोजी काल्याचे किर्तन व बारा वाजता दत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!