नॅचरल गॅस पाईपलाईनच्या अर्धवट कामाचे दुष्परिणाम सुरु ..
🟥 नॅचरल गॅस पाईपलाईनच्या अर्धवट कामाचे दुष्परिणाम सुरु ..
🟥 पाईपलाईन साठी खोदलेल्या खड्ड्यामुळे झालेल्या चिखलात चारचाकी रुतली व झाड कोसळले..
🟥 या घटनेमुळे लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबाबतही संभ्रम व स्थानिकांमध्ये संतापा सहित प्रशासनावर नाराजी..
🎥 Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ
🎴सावंतवाडी, दि-२६ :- नॅचरल गॅस कंपनीने गॅस पाईपलाईन साठी खोदलेल्या चरामुळे व हा चर माती टाकून रुजविण्यात आल्यामुळे पावसामुळे झालेल्या चिखलात चार चाकी रुतल्याची व झाड उन्मळून पडल्याची घटना रविवारी घडली. सावंतवाडी रेडी राज्यमार्गावरील शिरोडा नाका ते मळगांव बायपासवर जाणाऱ्या रस्त्यालगत गॅस पाईप लाईन चे काम अगदी पावसाच्या तोंडावर सुरू करण्यात आले. मात्र पाईप लाईन टाकून झाल्यानंतर केवळ माती ओढून अर्धवट स्थितीत असलेल्या या कामामुळे साईड पट्टीवर चिखलाचे साम्राज्य पसरले असून याचा फटका बसत चार चाकी गाडी मालकाला रविवारी बसला. तर रस्त्यालगत असलेले भलेमोठे आंब्याचे झाड उन्मळून पडले. तर हे झाड लगतच्या व्यावसायिकाच्या शेडवर पडल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले.
अर्धवट स्थितीत ठेवलेल्या कामामुळे झालेल्या नुकसानीबाबत स्थानिकांमध्ये तीव्र शब्दात संताप व्यक्त करण्यात येत असून प्रशासन व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे झाले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या नुकसानीला जबाबदार कोण असा संतप्त सवालही स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
सावंतवाडी शहरापासून झाराप-पत्रादेवी बायपास वर जाणाऱ्या या गॅस पाईप लाईनला सुरुवातीलाच माजगाव ग्रामस्थांनी विरोध केला होता. विशेष म्हणजे बऱ्याच वर्षानंतर या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले होते त्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता.मात्र त्यानंतर संबंधित ठेकेदाराने गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु केले होते.या कामामुळे साईड पट्टी व लगतच्या घरांचे मोठे नुकसान होणार असल्याने स्थानिकांनी हे काम सुरुवातीलाच रोखले होते.त्यानंतर प्रशासनाने हे काम पुन्हा अगदी पावसाच्या तोंडावर सुरू केले होते.
याचाच परिणाम म्हणून सहा ते सात फूट खोदाई करून टाकलेल्या गॅस पाईप लाईन वर केवळ माती ओढल्यामुळे शहरात पावसाचे पाणी शिरून चिखलाचे साम्राज्य पसरले आहेत अनेक ठिकाणी चर खचला आहे. पावसापूर्वी गॅस पाईपलाईन टाकून झाल्यानंतर याच जात दगडी सोलिंग करून त्यावर डांबरीकरण करणे गरजेचे होते मात्र तसे न झाल्याने आता वाहनधारकांना त्याचा फटका बसत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या झाराप-पत्रादेवी बायपास लगत ही याच प्रकारे अनेक ठिकाणी चर पडले आहेत. बायपास लगत असलेले सर्विस रोड खोदाई करून त्यात गॅस पाईपलाईन टाकण्यात आली. हे काम सुरू करताना स्थानिकांनी ठेकेदाराला याबाबत कल्पना दिली होती. मात्र ठेकेदाराच्या माणसांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती.
या ठिकाणचे खोदलेले चर बुजवताना ही केवळ माती टाकून त्यावर डांबरीकरण केल्यामुळे पहिल्याच पावसात त्या ठिकाणी डांबरीकरण खचले. त्यानंतर त्यावर दगड आणि खडी टाकून मलमपट्टी करण्यात आली. त्यामुळे डांबरीकरणाचा खर्च वाया गेला तो वेगळाच मात्र वाहनधारकांना व स्थानिकांना याचा मोठा फटका बसत असून वाहतुकीसाठी धोका निर्माण झाला आहे.
याबाबत महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांची वेळोवेळी संपर्क साधूनही त्याने त्याकडे दुर्लक्षच केले. विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी देखील या गॅस पाइपलाइनच्या कामाबाबत त्रुटींबाबत तटस्थ राहिल्यामुळे लोकप्रतिनिधीबाबतही तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने याबाबत लक्ष देऊन या समस्या त्वरित दूर कराव्यात अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
________________________
____________________
*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*
*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*
*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*👉🏻बी. ए.*
*👉🏻बी. कॉम.*
*👉🏻एम. कॉम.*
*👉🏻एम. बी. ए.*
*👉🏻रूग्ण सहायक*
*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*
*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*
*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*
*👉🏻एम.ए. (हिंदी)*
*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*
*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*
*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*
*📲मोबा- 8605992334*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*