शाळकरी मुलांचे नुकसान करणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासकावर निलंबनाची कारवाई करा..
माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांची गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी
सावंतवाडी दि.२१ मळगाव ग्रामपंचायत प्रशासक गणपत रामचंद्र लोंढे यांचा मनमानी कारभार सुरू असल्याबाबत अनेक तक्रारी आहेत तसेच अलीकडे मळगाव गावातील शाळेतील मुलांचे एबीसी फॉर्म वर सही करण्यास ते टाळाटाळ करत आहेत अशी तक्रार माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
याबाबतचा त्यांच्या तक्रारीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे शाळकरी मुलांचे नुकसान करणाऱ्या अशा ग्रामपंचायत प्रशासकावर निलंबनाची कारवाई करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी सदरची कारवाईसाठी गटविकास अधिकारी कार्यालयासमोर मंगळवार दि.२९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उपोषणास बसणार आहे असा इशारा मंगेश तळवणेकर यांनी दिला आहे.

