कृषिकोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सांगली येथे मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी पंप योजनेच्या लाभार्थ्यांचे सौर पंप कार्यान्वित.

या कामाची  सभापती सौ मानसी धुरी यांनी  केली पाहणी

कार्यकारी संपादक:- आनंद धोंड

सावंतवाडी,दि.२१ – डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत मा. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या लाभार्थ्यांचे सौर पंप कार्यान्वित झाले आहेत. या कामाची सांगेली येथे सभापती सौ मानसी धुरी यांनी पाहणी केली.

यावेळी गटविकास अधिकारी श्री वासुदेव नाईक ,सांगेली सरपंच डॉ मनस्वी लाड-राऊळ सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मोहीम अधिकारी श्री प्रशांत चव्हाण,श्रीम शारदा नाडेकर कृषी अधिकारी (समयो),श्री प्रकाश मोरे विस्तार अधिकारी (कृषी) तसेच लाभार्थी श्री सुरेश पांडुरंग सांगेलकर, श्री सदानंद सिताराम सांगेलकर व श्री कानू सखाराम कदम आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ३ किंवा ५ एचपी सोलर पंप व पूर्ण असेंम्बली दिली जाते.या योजनेमध्ये अनुसूचित जातीच्या शेतकरी याना ५ टक्के म्हणजेच ८२८० रुपये भरणा करावा लागतो.सर्वसाधारण शेतकरी याना १० टक्के म्हणजेच १६ हजार ५६० रुपये भरणा करावा लागतो.यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!