सावंतवाडी शहरात मेमनांची दहशत रफिक शेख यांच्यावर केला जीवघेणा हल्ला..
चार मेमनांविरुध्द सावंतवाडी पोलिसांत गून्हा दाखल
सावंतवाडी- शांत व सुसंस्कृत शहरात सर्व समाज गुण्यागोविंदाने नांदत असताना अलीकडच्या काळात मुस्लिम समाजातील मेमन जमातीतील काही व्यक्तींची दहशत मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने मूळ मुस्लिम समाजाला ही जमात डोईजड होऊ लागली आहे. काल झालेल्या छोट्याशा वादाबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या रफिक शेख या युवकाला युसुफ मेमन आफताब मेमन,हारून मेमन, युसूब च्या मुलाने बेदम मारहाण केली रफिक शेख याच्या डोक्यावर दगडाने प्रहार करून त्याला जबर जखमी केले.
हेल्थ फाउंडेशनचे अध्यक्ष सोहेल बेग यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रुग्णालयात हलविले, रुग्णालय प्रशासनाने याबाबत पोलिसांना कळविले रफिक शेख यांनी पोलिसात धाव घेत चार मेमनांविरोधात तक्रार दाखल केले असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
या शहराला गांधीजींनी रामराज्य असे संबोधले त्या शहरात अशी गुंडगिरी, दहशत संपुष्टात यावी अशी नागरिकांची मागणी आहे.मेमन समाजातील काही विशिष्ट माणसे अशा प्रकारची दहशत निर्माण करत असतील तर त्यांच्यावर कायद्याने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.तर रफिक शेख यांनी मेमन यांचे गैर धंदे पालिका व पोलीस प्रशासनाने उघडकीस आणावे असे आवाहन केले आहे.