चार ही रुग्ण ग्रामीण भागातील… तालुका वैद्यकीय अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली माहिती.
प्रतिनिधी – प्रशांत मोरजकर
सावंतवाडी,दि.२१ – तालुक्यात आज चार व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.शहरात आज एकही रुग्ण आढळून आला नाही.तर चारही रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.याबाबतची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यात ग्रामीण भागात मिळालेले रुग्ण बांदा एक,शेर्ले एक तर माजगाव दोन आदींचा समावेश आहे. आजपर्यंत करोना बाधीत रुग्णांची संख्या ८१९ झाली आहे तर आतापर्यंत ७२९ करोना बाधीत रुग्ण उपचार घेऊन तंदुरुस्त होऊन घरी परतले आहेत तर आतापर्यंत कोरोनामुळे तालुक्यातील ४४ रूग्णांना जीव गमवावे लागले. अजूनही १७ रुग्ण सक्रिय उपचार घेत आहेत.