कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी यांची आंबोली बस स्थानकाला भेट

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सहाय्यक जनसंपर्क अधिकाऱी. यांचे आंबोली बसस्थानक नियंत्रक विनोद वालावलकर यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले

ब्युरो न्युज -कोकण लाईव्ह ब्रेकिंग

सावंतवाडी – महाराष्ट्र राज्याचे राज्य मार्ग परिवहन महामंडळ साहाय्य जनसंपर्क अधिकारी अभिजीत वि भोसले यांनी आंबोली बस स्थानक येथे येऊन भेट दिली . बसस्थानकातील काही असलेल्या त्रुटी पूर्ण करून घेण्याच्या सूचना सावंतवाडी आगर व्यवस्थापक श्री पडोळे यांना केल्या कित्येक वर्ष मागणी करून व कोकण लाईव्ह च्या बातमीने सुरू करण्यात आलेल्या शौचालयाचे काम स्वच्छ व सुंदर चांगले दर्जाचे झाले पाहिजे अशा सूचना केल्या.
आजूबाजूचा परिसर स्वच्छ व सरळ करून येथे पार्किंग व्यवस्था वाढवावी व झाडे लावावीत अशा सूचना करण्यात आल्या. रा महामंडळाचे साहाय्य जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले त्यांच्यासमवेत श्री अरुण पवार वरिष्ठ लिपिक मुख्य कार्यालय मुंबई .श्री रोहित ढेंडे वरिष्ठ लिपिक कार्यालय मुंबई श्री पडोळे आगर व्यवस्थापक सावंतवाडी. श्री पी पी नेरूरकर स्थापत्य अभियंता सिंधुदुर्ग विभाग श्रीम गिरीजा पाटील अभियंता सिंधुदुर्ग विभाग अधिकारी उपस्थित होते
यावेळी वैभव राऊळ यांनी सहाय्यक जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांच्याकडे आंबोली बस स्थानक ला शहीद पांडुरंग गावडे यांचे नाव देण्याची मागणी केली असता अभिजीत भोसले यांनी सांगितले महाराष्ट्रात कुठल्याही बस स्थानकाला कोठेही असे नाव दिलेले नाही त्यामुळे असे नाव देता येणार नाही शहीद जवानांच्या वाली वारसांना नोकरीमध्ये पहिल प्राधान्य देण्यात येते अशा लाभार्थ्यांना नोकरीसाठी अर्ज करण्यास सांगावे असे आवाहन केले यावेळी भाजपचे वैभव राऊळ शिवसेनेचे युवा नेतृत्व हेमंत नार्वेकर विलास गावडे सामाजिक धडाडीचे कार्यकर्ते प्रवीण भिसे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!