क्राइमशासकीयसंपादकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

महाविकासआघाडी सरकार झाले थंडा; मटका जुगार अवैध दारूचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फंडा

▪️जिल्ह्यात अवैध व्यवसायांची मोठ्या प्रमाणात वाढ; युवा वर्गाचा अवैध मार्गाकडे ओढा

▪️येत्या २६ जानेवारी रोजी याबाबत मोठा उठाव करण्याचे नियोजन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे

🎴सावंतवाडी,दि.२०: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय वाढीस लागते असून त्यावर नियंत्रण ठेवणारी सक्षम यंत्रणाच कुचकामी ठरल्याने युवा वर्गाचा अवैध मार्गांकडे मोठ्या प्रमाणात ओढा वाढत चालला आहे. यामुळे भविष्यात युवा पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर असून हातातोंडाशी आलेली मुले पालकांना सरकारी यंत्रणेच्या कुचकामी धोरणामुळे गमवावी लागणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दहावीनंतर अकरावीमध्ये प्रवेश घेतलेली मुले झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी आपल्या मित्रांच्या सहकार्याने या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात वळू लागली असून रात्री-अपरात्री घरी येणे, पालकांना न जुमानने, पालकांनी जास्त त्रास दिल्यास आत्महत्येचा मार्ग पत्करने,  अशी कृत्य करू लागल्याने पालकांची पायाखालची वाळू सरकू लागली आहे. आपल्या मुलांना कसे आवरावे हा मोठा यक्ष प्रश्न पालकांसमोर उभा आहे. मात्र, या अवैध धंद्यांवर ज्या यंत्रणेने लक्ष ठेवून त्याला बंधन घालणे महत्त्वाचे आहे, तीच यंत्रणा हप्ते खाऊन कुचकामी ठरू लागली आहे.

संबंधित यंत्रणेच्या या भूमीकेमुळे जिल्ह्यात अवैध व्यवसायांना उधाण आले आहे. भले मोठे सरकारी पगार घेणारे अधिकारी या पगाराच्या चौपट हप्ता मिळून गब्बर होऊ लागले आहेत. ते ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर आलेली युवा पिढी आपले आयुष्य अर्ध्यावरच उध्वस्त करून घेत आहे. म्हातारपणी आई-वडिलांची काठी व्हायची सोडून युवा पिढी  व्यसनांच्या आहारी गेल्याने‌ या मुलांना आधार देण्याचे काम आता म्हातार वयात पालकांना करावे लागणार आहे. त्यामुळे भविष्यातील परिस्थिती भयावह होत चालली आहे. जिल्ह्यात चरस, गांजा, दारू, मटका, जुगार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. तर यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा भल्यामोठ्या हप्त्यांच्या लालसेपोटी मूग गिळून गप्प आहे. त्यामुळे यांच्या दरबारी दोन नंबर धंदेवाल्यांना आदराने खुर्ची दिली जाते. तर  प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्याला त्यांच्या कार्यालयाबाहेर तिष्ठत उभे राहावे लागते. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसाकाठी लाखो रुपयांची अवैध दारू, गुटखा, चरस, गांजा, वाहतूक होत आहे. हे सर्व उघड्या डोळ्यादेखत घडत असताना सरकारी यंत्रणा, अधिकारी त्यांच्याकडून लाखो रुपयांचा हप्ता घेऊन चिडीचूप आहेत.

काही वर्षांपूर्वी सावंतवाडी शहरातील कॉलेज मध्येही मुलांकडे गांजा पकडला गेला होता. याबाबत स्थानिक नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी आवाज उठवला होता. मात्र, सदर गांजा कोणी आणला? तो कोठून आला? याबाबत सखोल चौकशी झालीच नाही. त्यामुळे या गांजा प्रकाराला आळा बसला नाही. त्याचेच परिणाम म्हणून जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये गांजा विक्री  करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तर काही जागृत नागरिकांनी अशा तस्करांना पकडून देऊनही त्यांच्यावर मोका सारखी कारवाई केली गेली नाही. त्यामुळे काही दिवसातच हे आरोपी जामिनावर सुटून पुन्हा व्यवसायाला सुरुवात केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरकारी बंदी असलेला गुटखा मोठ्या प्रमाणात गोडवान मध्ये साठा करून ठेवण्यात आला आहे. दिवसाकाठी लाखो रुपयांचा गुटखा सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकला जात आहे. तरीही जिल्ह्याचे आरोग्य निरीक्षक मुग गिळून गप्प आहेत. तसेच गांजाही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पुरवला जात आहे. यामध्ये शफीक शेमन सारखी माणसे कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे. रस्त्यावर कटलरी वस्तू, गॉगल, विकणारी ही शफीक शेमनची औलाद आता करोडपती झाली आहे. त्यांच्याकडे हा पैसा कोठून आला? याची साधी चौकशी सुध्दा होत नाही व हीच मंडळी काही जमातीवर राज्य करत आहे. ही शोकांतिका आहे.

अधिकाऱ्यांना दिवाळी, गणेश चतुर्थीला भली  मोठी गीफ्ट देऊन त्यांना आपलेसे करायचे हा शफीक शेमनचा धंदा आहे. यावर आम्ही वेळोवेळी आवाज उठवला. मात्र, आमचा आवाज  बंद करण्यासाठी वेगवेगळ्या शकला लढवून कारस्थाने केली गेली. मात्र, या सर्व कारस्थानाला कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल पुरून उरला. ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा बाणा व हे धोरण कायम उराशी बाळगून कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल अविरतपणे सुरू आहे. या शफीक शेमन ने कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ला  अडचणीत आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. मात्र, त्यात त्याला यश मिळाले नाही.

सावंतवाडी शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यांनी आपले बस्तान बसवले आहे. जिल्ह्यातील काही भागात चरस, गांजा, राजरोस पकडला जातो. सामाजिक कार्यकर्ते पकडून देतात, त्यांनाही धमक्या देण्याचे सत्र आता सुरु झाले आहे. ज्या यंत्रणेने यावर अंकुश ठेवायला पाहिजे ती यंत्रणाच त्यांना सामील झाल्याने त्यांचे धैर्य वाढले आहे. म्हणजेच जर कुंपणच शेत खाऊ लागले तर शेतकऱ्याने काय करावे याप्रमाणे या अवैध धंद्याचे झाले आहे.

जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामध्ये प्रत्येक गावात त्या गावाचा पोलीस बीट अंमलदार म्हणून एका पोलिसाची नेमणूक केली जाते. त्या गावातील तंटा, तक्रारी, संबंधित बीट अंमलदार यांनी  सोडवायचे असतात. मात्र, गावातील अवैध धंदे सुरू राहण्यासाठी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हप्ता मिळत असल्याने गावोगावी ही आता अवैध धंद्याची दुकाने सुरू झाली आहेत. याला जबाबदार त्या गावचा पोलीस पाटील व बीट अंमलदार पोलीस आहे. तर शहराची परिस्थितीही तशीच आहे. शहरात अवैध धंदे मटका, जुगार, यासारखे प्रकार वाढीस लागले व त्यातूनच खून, दरोडे, चोरी, यासारखे प्रकार घडत आहेत. ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ या उक्तीप्रमाणे हे सर्व सुरू आहे. मात्र, यावर आवाज उठवणारे‌ असतील त्यांचा आवाज कसा बंद करायचा हे प्लॅनिंग संबंधित अधिकारी दोन नंबर व्यवसाय वाले एकत्र बसून करीत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व परिस्थितीवर प्रशासनाने अंकुश ठेवणे गरजेचे असते. मात्र, प्रशासनातील काही अधिकारी प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार करत असल्याने जिल्ह्यातील भविष्यातील परिस्थिती भयावह होणार हे सांगायला आता ज्योतिषाची गरज राहिली नाही.

म्हणून या अराजकतेच्या विरोधात कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या माध्यमातून २६ जानेवारी रोजी उठाव करण्याचे ठरवले असून त्यादृष्टीने विविध सामाजिक संघटनांशी बोलणी केली जात आहे. जेणेकरून ‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतोय’ म्हणून हे सर्व केले जाणार आहे. या लढ्यात सर्व जनतेने आम्हाला साथ द्यावी अशी विनंती आहे.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!