नगरपालिकेची धडक कारवाई; SPK समोरील सर्व स्टॉल हटविले
सावंतवाडी : शहरातील अनधिकृत स्टॉलधारकांविरोधात सावंतवाडी नगरपालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. SPK महाविद्यालयासमोरील रस्त्यालगत असलेले सर्व स्टॉल नगरपालिका पथकाने हटविले. या कारवाईमुळे स्टॉलधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
SPK महाविद्यालयासमोरील परिसरात विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले होते. त्यामुळे वाहतुकीस तसेच नागरिकांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत असल्याने नगरपालिका प्रशासनाने ही कारवाई केली.
दरम्यान, SPK समोरील स्टॉल हटविल्यानंतर शहरातील इतर ठिकाणी असलेल्या स्टॉलवरही नगरपालिका कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनधिकृत स्टॉलधारकांचे धाबे दणाणले असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

