पार्ट-द पार्टी हाऊस भविष्यात चिपळूणची ओळख ठरेल; वैभव खेडेकर

▪️उपक्रमशील प्रियांका मिरगावकर यांच्या पार्ट द पार्टी हाऊसची दुसरी भव्य शाखा लवकरच..*

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.१२: लगतच्या पिंपळी येथे सुरु झालेल्या पार्ट-द पार्टी हाऊसचे आज शुक्रवारी मनसेचे सरचिटणीस, खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. या वेळी मनसेचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विश्वास मुधोळे, तालुकाध्यक्ष संतोष नलावडे, सांज-सोबती संस्थेचे पराग वडके, मनसेच्या विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल अवेरे, पार्टच्या संचालिका प्रियंका मिरगावकर, विवेक मोरे, सुनील हळदणकर, मुबिन गोठे, पिंट्या निवळकर, संतोष हतिसकर, पिंपळीच्या पोलीस पाटील दीपाली भाबल, सौ. रश्मी कदम, मनसेचे उपतालुकाप्रमुख अभिनव गुरव, विजय मिरगावकर, भरत शिरगावकर, वैशाली मिरगावकर आदी उपस्थित होते. फित कापून पार्टचे उद्घाटन झाले. प्रियांका मिरगावकर यांनी द रॉक फिटनेस जिम, बहादुरशेख नाका, पार्ट प्रॉडक्शन हाऊसनंतर आता पार्ट-द पार्टी हाऊसच्या माध्यमातून हॉटेल व्यवसायात पदार्पण केले आहे. वैभव खेडेकर व मान्यवरांचे स्वागत विजय मिरगावकर, अमित मिरगावकर, भरत शिरगावकर यांनी केले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी मिरगावकर दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या व या नव्या उपक्रमाचे कौतुक केले. नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सांगितले की  मराठी माणसाने व्यवसायाच्या माध्यमातून उभे राहिले पाहिजे, हे राजसाहेब ठाकरे यांचे विचार अमित मिरगावकर व प्रियंका मिरगावकर प्रत्यक्षात आणत आहेत. पार्ट-द पार्टी हाऊस भविष्यात चिपळूणची ओळख ठरेल.त्यांनी या ठिकाणी कुटुंबाच्या राहण्याची तसेच बिझनेस कॉन्फरन्स, मीटिंग, बर्थडे सेलिब्रेशनसाठी खास सुविधा उपलब्ध केली आहे. त्याचबरोबर कोकणी पद्धतीचे मालवणी, संगमेश्वरी वडे-मटण असे चवीने खाणाऱ्यांना सारेकाही व चुलीवरील जेवण असल्याने खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला.त्याचसोबत अमित मिरगावकर दांपत्याच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले.यावेळी  संतोष नलावडे, विश्वास मुधोळे, पराग वडके आदींनी मिरगावकर दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक अमित मिरगावकर यांनी केले. कोरोनाच्या काळात नागरिकांना वेगळा निसर्गरम्य परिसर, वेगळी चव अनुभवायला मिळावी, या हेतूने आपण पार्ट-द पार्टी हाऊसच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे. लवकरच कोळकेवाडी येथे साडेचार एकरमध्ये बोटिंग, रो हाऊस अशा पद्धतीने पर्यटकांना आकर्षित करेल, असा भव्य प्रकल्प पार्टच्या माध्यमातून उभारला जात आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार योगेश बांडागळे यांनी केले तर आभार प्रियांका मिरगावकर यांनी मानले.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!