माजगावातील क्षय रुग्णांना पोषण आहार
माजगावातील क्षय रुग्णांना पोषण आहार
ओटवणे
माजगावातील क्षयरुग्णांना सहा महिन्यासाठी दत्तक घेऊन पोषण आहार देण्याचा संकल्प माजगाव ग्रामपंचायत सदस्य अशोक धुरी यांनी केला. हा आहार त्यांनी सरपंच डॉ. अर्चना सावंत यांच्यांकडे सुपुर्द केला. यावेळी डॉ. सौ. सुप्रिया धाकोरकर यांनी आयुष्यमान भव व अवयवदानासंदर्भात मार्गदर्शन केले. सरपंच सावंत, अशोक धुरी, माधवी भोगण, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सौ. सुजाता धुरी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन साईनाथ वेटे यांनी केले.

