युवा नेते विशाल अभिष्टचिंतन सोहळा उद्या
युवा नेते विशाल अभिष्टचिंतन सोहळा उद्या
सावंतवाडी
भाजपचे युवा नेते, युवा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळा रविवार १५ आक्टोबरला साजरा होणार आहे. यानिमित्त जिमखाना मैदानावर प्रख्यात सिंगर जुबिन नौटियाल यांचा लाईव्ह कॉन्सर्ट सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या शोची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
शोसाठी स्टेज व्यवस्था तसेच बैठक व्यवस्था आदींची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला हजारो रसिकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या शो तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, शिरोडा, वेंगुर्ले, माणगाव आदी भागात या शोच्या प्रवेशासाठी बँड उपलब्ध करण्यात आले आहेत. लोकांचा प्रतिसाद पाहून ज्यांच्याकडे बँड नसेल त्यांनाही प्रवेश दिला जाणार आहे. या शोसाठी सिंधुदुर्ग, गोवा, रत्नागिरी, कोल्हापूर आदी भागातून मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक येणार आहेत.
नगरपालिकेच्या मुख्य जिमखाना मैदानावर हा शो होत असून त्यासाठी स्टेज व बैठक व्यवस्थेची तयारी करण्यात येत आहे. त्याची पाहणी विशाल परब यांनी केली. कार्यक्रम दर्जेदार व्हावा, या दृष्टीने सर्व सूचना त्यांनी केल्या. भाजप व विशाल परब मित्रमंडळातर्फे हा शो होत असून भाजपचे जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र मंडळ कार्यरत आहेत दरम्यान परब यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी रात्री १० वाजता तलावाकाठी फटाक्याच्या आतिषबाजी केली जाणार आहे.

