जिल्ह्यात २७ ऑक्टोबरपर्यंत मनाई आदेश जारी
जिल्ह्यात २७ ऑक्टोबरपर्यंत मनाई आदेश जारी
ओरोस
आगामी काळात जिल्ह्यात होणाऱ्या ग्रा. पं. निवडणुका आणि नवरात्रोत्सव कार्यक्रम दरम्यान जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी, यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी १३ ते २७ ऑक्टोबरपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत.३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षाचे प्रतिस्पर्धा गट आपआपल्या कार्यकर्त्यांची जमवाजमव कार्यकर्ते मेळावे, कॉर्नर सभा घेऊन एकमेकांना लक्ष्य करीत आहेत. राज्यात विविध समाजाचे लोक आरक्षणाचे मुद्यावरुन आक्रमक होताना दिसत आहेत. त्याचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच १५ ते २४ ऑक्टोबर या कालावधीतील नवरात्रोत्सव, दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिन या पार्श्वभूमीवर हे मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.

