वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची माळ लंपास
वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची माळ लंपास
कसाल
वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिच्या गळ्यातील सोन्याची माळ घेऊन चोर पसार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सहा ते साडेसहा या दरम्यान कसाल केळूसकरवाडी येथे घडली. केळूसकरवाडी येथील रहिवासी जानकी रामचंद्र पवार (वय वर्षे ८५) या सकाळी बाथरुमला जाऊन परत घरात येत असताना अनोळखी व्यक्तीने त्या घरात एकट्याच असल्याचा फायदा घेत घरात घुसून गळा पकडला व सोन्याची पावणे दोन तोळ्याची माळ जबरदस्तीने खेचून घेऊन पसार झाला. सदर अनोळखी व्यक्तीने अंगावर काळसर रंगाचे कपडे घातले. होते, असे जानकी पवार यांनी सांगितले. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कोल्हटकर व त्यांचे सहकारी करीत आहेत.

