कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

अत्याचार प्रकरणात सशर्त जामीन मंजूर

अत्याचार प्रकरणात सशर्त जामीन मंजूर

सावंतवाडी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ओटवणे येथील एका युवकावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७६, ३५४ (a) व लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम (पोस्को) २०१२ चे कलम ४, ८, १२ अन्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली होती. ओरोस जिल्हा व सत्र न्यायालयात संशयित आरोपीतर्फे वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला होता. आरोपीतर्फे वकिलांनी फिर्यादीने दिलेली फिर्याद नऊ महिन्याच्या प्रदीर्घ विलंबानंतर केल्याचे न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले संशयित आरोपीतर्फे
वकिलांनी केलेला युक्तिवाद
न्यायालयाने ग्राह्य मानून आरोपीला २५ हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. १० ऑगस्ट २०२३ रोजी फिर्यादीच्या चुलत भावाने पालकांच्या कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळवून नेल्याची तक्रार सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. परंतु ११ ऑगस्ट २०२३ रोजी फिर्यादी स्वतःच्या घरी आढळून आली.. पोलिसांच्या तपासात फिर्यादी ही अल्पवयीन असून तिच्यावर संशयिताने ५ डिसेंबर २०२२ रोजी अत्याचार केल्याचे निर्दशनास आले. संशयिताला १२ ऑगस्ट २०२३ रोजी अटक करण्यात आली होती.
संशयितातर्फे अॅड. बाबाजी राणे, अॅड. वैभव देसाई व अॅड. विष्णू सावंत यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!