कुडाळकोकणक्राइममहाराष्ट्र

बेकायदा वाळू वाहतुकीवर कुडाळ येथे कारवाई 

बेकायदा वाळू वाहतुकीवर कुडाळ येथे कारवाई

कुडाळ

शासनाच्या परवानगीशिवाय बेकायदा उत्खनन केलेली वाळू चोरी करून अवैधरित्या वाहतूक केल्याप्रकरणी गोवा येथील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन डंपरसह एकूण दहा लाखाचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. ही कारवाई कुडाळ पोलिसांनी कुडाळ- . एमआयडीसी कार्यालयासमोरील मार्गावर बुधवारी मध्यरात्रीनंतर सव्वादोन वाजण्याच्या सुमारास केली. फिर्याद कुडाळ. पोलिसांत रामदास विनायक गोसावी (कुडाळ पोलीस ठाणे )यांनी दिली आहे. ते शहरात गस्त घालत असताना कुडाळ- एमआयडीसी कार्यालयासमोरील मार्गावर वाळूने भरलेले दोन डंपर आढळले. त्यांच्याजवळ वाळू वाहतूक परवाना आढळून आला नाही. वाळू चोरी करून अवैधरित्या वाळू वाहतूक केल्याप्रकरणी अनिल हनुमंत भंडारी (३१, रा. वळपे कॉलेजनजीक, पेडणे-गोवा), संतोष विठ्ठल चव्हाण (२६, रा. मालपे एचपी पेट्रोल पंपानजीक, गोवा), विशाल गणेश नाईक (रा. अनखण्या, ता. पेडणे- गोवा), सचिन सुरेश नाईक (रा. आडपई-फोंडा, गोवा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!