कुडाळकोकणमनोरंजनमहाराष्ट्र

हिर्लोक गिरोबा मंदिर येथे नवरात्रोत्सवानिमित्त कार्यक्रम

हिर्लोक गिरोबा मंदिर येथे नवरात्रोत्सवानिमित्त कार्यक्रम

डिगस

गिरोबा युथ ग्रुप नवरात्रोउत्सव मंडळ हिर्लोक यांच्यावतीने हिर्लोक हायस्कूल गिरोबा मंदिरजवळ १५ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

१५ रोजी सकाळी १० वा. दुर्गा देवीचे आगमन, पूजन, आरती, भजन व रात्री ८ वा. सरंबळकर भजन मंडळ हिर्लोक सडेवाडी यांचे भजन, ९ वा. दांडिया नृत्य. १६ रोजी ७.३० वा. महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळ नारुर यांचे भजन, रात्री ८ वा. गजा नृत्य व दांडिया नृत्य. १७ रोजी ७.३० वा. श्री पांडुरंग प्रासादिक भजन मंडळ डिगस यांचे भजन, रात्री ८ वा. महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धा, ९ वा. जादुगार वैभव कुंभार यांचे जादुचे प्रयोग. १८ रोजी ७.३० वा. श्री गवळदेव प्रासादिक भजन मंडळ डिगस यांचे भजन, रात्री ८ वा. पंचक्रोशी (मर्यादित महिलांसाठी फुगडी स्पर्धा,

९ वा. दांडिया व गरबा नृत्य, १९ रोजी रात्री ७.३० वा. श्री माऊली • भजन मंडळ किनळोस यांचे भजन, ८ वा. लहान व मोठ्या गटासाठी रेकॉर्ड डान्स स्पर्धा, ९ वा. मिमिक्री आर्टीस्ट विजय फाले यांचा कॉमेडी शो, १० वा. दांडिया नृत्य. २० रोजी रात्री ७.३० वा. राजेश गुरव यांचे भजन, ९ वा. दांडिया व गरबा नृत्य. २१ रोजी दुपारी ३ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी ७.३० वाजता भजने, रात्री १० वा. दांडिया. २२ रोजी सायंकाळी ७.३० वा. भजन, गरबा नृत्य. २३ रोजी सायंकाळी ७.३०० वा. भजन, दांडिया व गरबा नृत्य २४ रोजी सायंकाळी ३० वा. भजन, ९ वा. फॅन्सी ड्रेस (वेशभूषा) स्पर्धा, दांडीया व गरबा नृत्य. २५ रोजी दुपारी १२.३० वा. आरती, १ वा. महाप्रसाद, ३ वा. महाआरती, सायंकाळी ४ वा. दुर्गामाता विसर्जन होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन हिर्लोक ग्रामस्थ व गिरोबा युथ ग्रुप नवरात्रोत्सव उत्सव मंडळ | यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!