महाराष्ट्ररत्नागिरी

वात्सल्य मंदिर ओणी संचलित, महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनंतर्गत महिला व मुलांसाठी सहाय्यता कक्ष पोलीस ठाणे राजापूर आयोजित जनजागृती कार्यक्रम

*🟥वात्सल्य मंदिर ओणी संचलित, महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनंतर्गत महिला व मुलांसाठी सहाय्यता कक्ष पोलीस ठाणे राजापूर आयोजित जनजागृती कार्यक्रम*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर*

*🎴 राजापूर , दि.२६:* वात्सल्य मंदिर, ओणी संचलित, महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य ह्यांची मान्यता प्राप्त असलेल्या महिला व मुलांसाठी सहायता कक्ष राजापूर पोलीस ठाणे येथे कार्यरत आहे. महिलांवर आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंध करून त्यांना संरक्षण उपलब्ध करून देण्याचे काम या कक्षमार्फत केले जाते. कौटुंबिक हिंसाचार अधिनियम २००५ नुसार महिलांचे संरक्षण कायद्याअंतर्गत कौटुंबिक हिंसाग्रस्त व पीडित महिलांना ह्या केंद्रामार्फत न्याय मिळवून दिले जातात. परंतु बहुतांशी महिलांना ह्या कायद्याबाबत माहिती नसते तसेच त्या बाबत दाद कुठे व कशी मागावी ह्याची माहिती नसते. त्यामुळे अशा महिला वर्षानुवर्षे कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरतात. ह्या कायद्याची माहिती तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचावी व त्यांच्यावरील अन्यायाला आळा घालण्यासाठी महिला सहायता कक्ष आणि पोलीस ठाणे राजापूर ह्यांच्या माध्यमातून कोदवली ग्रामपंचायत येथे जननी प्रभागसंघ कोदवली येथे बुधवार दिनांक २३.०८.२०२३ रोजी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा २००५ ह्या बाबत जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये महिला व मुलांसाठी सहायता कक्ष पोलीस ठाणे, राजापूर येथील समुपदेशक श्वेता देसाई आणि सायली लिमये ह्यांनी महिलांना कौटुंबिक हिंसाचार कायद्याबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे महिला समुपदेशन कक्षाविषयी माहिती तसेच ह्या केंद्राचे कामकाज कसे चालविले जाते ह्याबाबत मार्गदर्शन केले. कायद्याच्या माहितीची पत्रके वाटण्यात आली आणि वात्सल्य मंदिर ह्या बालकाश्रम विषयी माहिती दिली. ह्यामध्ये काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या मुलांसाठी वात्सल्य मंदिर बालगृह चालवीत असून त्याची माहिती उपस्थितांना दिली. गरजूंना ह्याचा लाभ मिळावा ह्यासाठी आवाहन केले. कार्यक्रमामध्ये जननी प्रभागसंघाच्या अध्यक्षा श्रीम. रजनी डाम्बरे, उपाध्यक्ष श्रीम. गीता टिळेकर , प्रभाग व्यवस्थापक श्रीम. आदिती बाईत आणि पदाधिकारी व सुमारे ४२ महिला उपस्थित होत्या.आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!