शासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

इंदिरा गांधी व्यापारी संकुलामधील गाळे भाडे कराराचा भंग करुन परस्पर लाटले..

▪️संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी; रफिक शेख यांची नगराध्यक्षांकडे मागणी

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.०७: नगर परिषदेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलामधील गाळे भाडे कराराचा भंग करत परस्पर लाटण्यात आले आहेत. पालिकेकडून ९ वर्ष करारासाठी घेतलेल्या गाळ्यांचा भाडेकरार संपल्यानंतर सदर गाळे नगरपरिषदेच्या परवानगीशिवाय परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून बेकायदा आपल्या कब्जात घेऊन भाडे कराराचा भंग केला आहे. त्यामुळे संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रफिक शेख यांनी नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडे केली.

सावंतवाडी नगरपरिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था असून महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ९२ अन्वये सावंतवाडी नगरपरिषद आपली मालमत्ता केवळ नऊ वर्षापर्यंत भाडेकरार करून भाडेतत्वावर देऊ शकते.

नऊ वर्षापेक्षा जास्त कालावधीचा भाडेकरार करावयाचा झाल्यास त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या परवानगीची आवश्यकता असते. सावंतवाडी नगर परिषदेच्या इंदिरा गांधी व्यापारी कॉम्प्लेक्स व बाप्पा नार्वेकर व्यापारी कॉम्प्लेक्स मधील गाळे हे देखील १९६५ चे कलम ९२ अन्वये भाडेकराराने ९ वर्ष कालावधीसाठी दिले होते. सदरच्या काळ्यांचा करार संपल्यानंतर सदरचे गाळे नगर परिषदेच्या परवानगीशिवाय व्यापाऱ्यांकडून इतर परप्रांतीय व्यापाऱ्यांनी बेकायदेशीर रित्या आपल्या कब्जात घेऊन व्यवसाय सुरू केलेले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!