सेवानिवृत्त माजी सैनिकांच्यावतीने सशस्त्र सेना झेंडा दिवसाचे आयोजन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.०७: सैनिकांच्या कल्याणकारी उपक्रमांना सावंतवाडी नगरपरिषद सदैव सहकार्य करेल, त्यात राजकारण होणार नाही आणि खोटं बोलणार नाही, हा माझा शब्द आहे, असे नगराध्यक्ष संजू परब यांनी बोलताना सांगितले.
सावंतवाडी नगरपालिकेच्या माध्यमातून येत्या मार्चपूर्वी शहरात सैनिक प्रशिक्षण केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देऊ हा माझा शब्द आहे, असे आश्वासन नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे दिले.
सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त माजी सैनिकांच्या वतीने येथील नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृह मध्ये सशस्त्र सेना झेंडा दिवस आयोजित करण्यात आला होता. या वेळी कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून नगराध्यक्ष संजू परब बोलत होते.
यावेळी विरोधी गटानेत्या नगरसेविका अनारोजीन लोबो, सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघाचे अध्यक्ष तातोबा गवस उपस्थित होते.
नगराध्यक्ष श्री. परब म्हणाले, माजी सैनिक संघाकडून सावंतवाडी शहरामध्ये सैनिक प्रशिक्षण संघासाठी जागेची मागणी करण्यात आलेली आहे. त्यासाठी त्यांनी प्रस्तावही दिलेला आहे. देशाच्या सीमेवर सैनिक आमच्यासाठी लढत असताना त्यांना पाच गुंठे जागा देणे हे काहीच नाही. त्यामुळे माजी सैनिकांनी केलेली मागणी लक्षात घेता त्यांना शहरांमध्ये जागा उपलब्ध करून देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवक यांच्याकडून एक मताने ठराव मंजूर करून तो जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी खास बाब म्हणून प्रयत्न केला जाईल. तसेच या महिन्यात ठराव मंजूर करून नवीन वर्षाच्या सुरुवातीला पालिकेच्या तसेच या महिन्यात ठराव मंजूर करून नवीन वर्षाच्या सुरुवातीला पालिकेच्या कौन्सिलमध्ये मंजूर झालेला ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवू आणि येत्या मार्चपूर्वी माजी सैनिक संघाकडे जागेचा ताबा देऊ, असे नगराध्यक्ष श्री. परब म्हणाले.
राजकारणात केव्हातरी खोटी आश्वासने दिली जातात. मात्र, माजी सैनिकांना कुठल्याही प्रकारचे खोटे आश्वासन आपण देत नाही. आपल्याला माजी सैनिकांबद्दल नितांत आदर जिव्हाळा आहे. याचे उत्तर आपण त्यांना हवी असलेली जागा शहरांमध्ये उपलब्ध करूनच देणार आहे, असे नगराध्यक्ष श्री. परब यांनी सांगितले.
यावेळी विरोधी गटानेत्या अनारोजीन लोबो व नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी माजी सैनिकांना जागा देण्यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा राहणार असून चांगल्या कामासाठी आम्ही सदैव पुढे असणार आहोत. सावंतवाडी तालुका हा माजी सैनिकांचा गड असून माजी सैनिकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी नेहमी त्यांच्या पाठीशी राहू असे सांगितले.
अमर रहे शहीद जवान अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी नगर परिषदेचे आरोग्य व क्रीडा सभापती परीमल नाईक, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, मनोज नाईक, आनंद नेवगी, नगरसेविका माधुरी वाडकर, भारती मोरे, शुभांगी सुकी, दिपाली सावंत, माजी नगरसेवक राजू मसुरकर, पंचायत समिती सदस्य रवींद्र मडगावकर, सैनिक व माजी सैनिक रुपेश आईर, संघाचे सचिव संजय सावंत, दीपक शिर्के, अजय शिर्के, जगन्नाथ परब, आप्पा गावकर, दिगंबर नाईक, प्रशांत शिंदे, सचिन सावंत, भास्कर कोचरेकर, गजानन तेजम आणि कुटुंबीय उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर प्रभू यांनी केले. त्यांनी सशस्त्र सेना दिनाचे महत्त्व सांगितले. यावेळी माजी सैनिकांनी उस्फूर्तपणे अमर रहे शहीद जवान अमर रहे’च्या घोषणा दिल्या. कारगिल युद्धातील सैनिकांनी आपली मांडली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात सैनिक संघाचे अध्यक्ष तातोबा यांनी सावंतवाडी शहरामध्ये शहीदांसाठी स्मारक व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_