कुडाळकृषिराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

मनसे आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर वंचित शेतकऱ्यांना मिळणार मागील वर्षीची भात पीक नुकसान भरपाई..

▪️येत्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार असल्याची तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.०७: मागील वर्षी सन २०१९ च्या हंगामात जुलै ते सप्टेंबर हंगामात अतिवृष्टीमुळे व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या भातपिकाचे प्रचंड नुकसान होऊन बळीराजा मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला होता. तत्कालीन कालावधीत  राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने राज्यपाल महोदयांनी शेतकऱ्यांना हेक्टरी ६ हजार रुपये मदत जाहीर करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कुडाळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव काही कामचोर शासकीय कर्मचाऱ्यांनी विहित वेळेत जिल्हा प्रशासनापर्यंत सादर न केल्याने बहुसंख्य शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते. याबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेत दिवाळीपर्यंत मागील वर्षीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतल्याने वरिष्ठ पातळीवरून सदरची नुकसान भरपाई रक्कम मंजुर करण्यात आली असून येत्या आठवड्यात ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली आहे.

*_🧰💡आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला नाही कशाला निराश होताय???…निश्चिंत रहा..मुक्त विद्यापीठ आपणास तंत्र शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे🤩😍_*

   *🧰डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन🧰*
_तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी_

💫आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा!

*🏃🏻‍♂️प्रवेश सुरु*
*सावंतवाडी अभ्यास केंद्र संपर्क*
*_📱9422896699_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!