आमदार वैभव नाईक यांनी आणलेल्या निधीच्या माहितीसाठी नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी आमने-सामने यावे..
▪️शिवसेना कुडाळ शहरप्रमुख संतोष शिरसाट यांचे खुले आव्हान..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.०५: आपण निवडून आलात काँग्रेसच्या चिन्हावर; आपणाला काँग्रसचा प्रतिनिधी म्हणून लोकांनी आपल्यावर विश्वास टाकून निवडून दिले, पण आपण जनतेचा व काँग्रेसचा विश्वासघात केला. आजही तुमची भूमिका तळ्यात-मळ्यात आहे, हे पहिले स्पष्ट करा, कारण आरक्षणनंतर तुम्ही काय कराल हे जनतेला नंतर दिसेलच.
आमदार वैभव नाईक यांनी आणलेला निधी कागदावर आहे असे सांगणारे कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी आमने-सामने यावे. कुडाळमध्ये आमदार वैभव नाईक यांनी किती निधी आणला आणि किती खर्च केला याचा लेखाजोखा आम्ही मांडता. त्यासाठी नगराध्यक्ष ओंकार तेली जी वेळ जे ठिकाण सांगतील त्यासाठी आम्ही तयार आहोत. असे खुले आव्हान शिवसेना कुडाळ शहरप्रमुख संतोष शिरसाट यांनी दिले आहे.
संतोष शिरसाट पुढे म्हणाले, “कुडाळमध्ये मश्चिंद्रनाथ कांबळी नाट्यगृहासाठी १३ कोटी निधी आमदार वैभव नाईक यांनी मंजूर करून आणला. त्यानिधीतून या नाट्यगृहाचे प्रत्यक्ष काम देखील सुरू झाले आहे. राज्याच्या नगरविकास विभागाच्या निधीतून हे काम होत असून ओंकार तेली यांनी याची माहिती घ्यावी. तसेच शहरात दोन कोटीच्या निधीतून अद्यावत असे क्रीडांगण उभारण्यात येत आहे शहरात सुलभ शौचालयचा प्रश्न होतो तो ओंकार तेली यांना सोडविता आला नाही. आम. वैभव नाईक यांनी तो प्रश्न सोडविला व नगरपंचायतीच्या ताब्यात सुलभ शौचालय दिले. मात्र ओंकार तेली यांना त्या सुलभ शौचालयाची स्वच्छता ठेवण्यासाठी ठेकेदार नेमता आला नाही. कुडाळ नगरपालिकेची सत्ता विरोधकांकडे असतानाही जिल्हा नियोजनमधून गेल्या पाच वर्षात कोट्यावधींचा निधी देण्यात आला. त्यातून शहरातील रस्ते सुस्थितीत करण्यात आले. कुडाळमध्ये चांगली अग्निशमन व्यवस्था असावी अशी कुडाळ शहरवासीयांची मागणी आहे. आमदार वैभव नाईक यांनी नगरविकास विभागाकडे यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार नगरविकास विभागाने कुडाळ नगरपंचायतीकडे प्रस्ताव मागविला आहे. परंतु अद्यापपर्यंत त्याचा प्रस्ताव देण्यात आलेला नाही. भंगसाळ नदीवर उद्यानासाठी अगोदर २ कोटी व आता २.५ कोटी असे एकूण ४.५ कोटी आमदार वैभव नाईक यांनी मंजूर करून आणले. हे उद्यान उभारले गेले असते तर कुडाळमध्ये पर्यटन वाढले असते. परंतु नगराध्यक्ष ओंकार तेली हे यासाठी विरोध करीत आहेत याचा जनता नक्कीच विचार करेल.”
आमदार वैभव नाईक यांनी ऐतिहासिक घोडेबाव विहिरीसाठी १५ लाख रुपये निधी मंजूर करून ते काम पूर्णत्वास नेले आहे. भंगसाळ नदीवर बंधारा बांधण्यात आला. यावर्षी नगरविकास विभागामार्फत आमदार वैभव नाईक यांनी ५ कोटींचा निधी कुडाळसाठी मंजूर करून आणला तो निधी फक्त खर्च झालेला नाही.
केंद्रात भाजपची सत्ता आहे. कुडाळचे नगराध्यक्ष या नात्याने केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून किती निधी आणला हे देखील ओंकार तेली यांनी जाहीर करावे कुडाळमध्ये ओंकार तेली यांना एखादे भाजीमार्केट, मच्छिमार्केट बांधता आलेले नाही. आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून सुसज्ज एस.टी. स्टॅण्ड बांधण्यात आले. एस.टी. स्टॅणंडच्या समोर शेड उभारण्यासाठी मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यासाठी एस.टी. स्टॅण्डचे उद्घाटन थांबविण्यात आले होते. मात्र लवकरच याचे उद्घाटन करण्यात येईल.
याउलट मालवणमध्ये आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांच्या माध्यमातून मालवण शहराचा विकास झपाट्याने होत आहे. हे तेथील विरोधी नगरसेवक सुदेश आचरेकर यांनीदेखील मान्य केले आहे. कुडाळ नगराध्यक्ष मात्र मनमानी कारभार करत आहेत. याचा फटका कुडाळ शहरला बसत आहे. यामुळे कुडाळचा विकास खुंटल आहे. याचा ओंकार तेली सर्वस्वी जबाबदार आहेत. हे जनतेला कळून चुकले आहे. कुडाळच्या जनतेचे आमदार वैभव नाईक यांच्यावर विशेष प्रेम आहे. त्यामुळेच गेल्या तिन्ही विधानसभा निवडणूकीत कुडाळ शहरात त्यांना मताधिक्य मिळाले होते.
ओंकार तेली यांनी वाढीव मुल्यांकनाप्रमाणे नको असलेली जागा कचऱ्यासाठी घेतली. तसेच कुडाळ शहरातील मुख्य रस्त्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी बजेट अंतर्गत २ कोटी रूपये मंजर करून घेतले होते. परंतु काही बिल्डर, ठेकेदार यांच्याकडून होणाऱ्या फायद्यासाठी नगरपंचायतीने हा रस्ता आपल्या ताब्यात घेतला. हे देखील कुडाळवासीय विसरले नाहीत, अशी पोलखोल संतोष शिरसाट यांनी केली आहे.
नगराध्यक्षांचे म्हणणे आहे की, काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायतीवर दबाव आणून कोविड काळात दुकाने चालू ठेवली. परंतु, वस्तुस्थितीची माहिती न घेता नगराध्यक्षांनी केलेले आरोप हे अत्यंत खोडसाळ आहेत. केंद्र सरकारने अत्यावश्यक सेवेचे जाहीर केलेल्या अद्यादेशानुसार जी दुकाने सुरू होती ती जिल्हाधिकारी यांनी दिलेली परवानगी ही केंद्र सरकारने काढलेल्या अद्यादेशाचा आधार घेऊनच दिली होती. यात कोणताही राजकीय हस्तक्षेप किंवा दबाव आणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आतापर्यंत जाहीर केलेले कार्यक्रम किंवा कोणत्या योजना पूर्णत्वास नेलेल्या आहेत हे आपण जाहीर करावे व जनतेची फसवणूक थांबवावी. परंतु आता जनताच काय तुमच्या पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी सुद्धा समजून चुकले आहेत.
लॉकडाऊन काळात आपण बाजारपेठ व व्यापाऱ्यांची दुकाने कशी बंद राहतील व आपले दुकान कसे चालू राहील त्यासाठी आपण कुठले-कुठले प्रयत्न केले हे सर्व व्यापाऱ्यांना ज्ञात आहे. तसेच आपण नगरपंचायतीच्या अधिकारांचा पुरेपूर फायदा घेऊन पोस्ट ऑफिसजवळ बॅरिकेट लावायला लावून बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना वेठीस कसे धरले हे सर्वांना माहित आहे. आपण आपल्या दुकानात सोशल डिस्टंसिंग नियम अजिबात पाळले नव्हते, याचे पुरावे आमचेकडे आहेत. मान. माजी केंद्रीय मंत्री सुरेशजी प्रभू कोविड काळात केंद्र सरकारकडून मच्छिमारी व मच्छिविक्री ही विशेष प्रयत्न करून परवागनी घेऊन राज्य शासनाला दिली होती. परंतु सोशल डिस्टंसिंगच्या नावाखाली प्रशासकीय यंत्रणा हाताशी धरून मच्छिमार्केटमधील मच्छिविक्रेत्या महिलांना सळो की पळो करून सोडले त्यामुळे त्यांची ‘भीक नको पण……’ अशी अवस्था झाली होती.
कुडाळ शहरात पुर्वीपासूनचे भाजीमार्केट असून त्या भाजीमार्केटमध्ये भाजीविक्रेत्यांना ५ वर्षात कधीही बसविण्याचा भाजीमार्केटचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न जाणिवपूर्वक केला नाही. परंतु कोविडचे कारण देऊन पोस्ट ऑफिसपासून पुढे भाजीविक्रेत्यांना बसण्यास भाग पाडले व जुने भाजीमार्केट व मुख्य बाजारपेठ ओस पाडण्याचे षडयंत्र सुरू आहे, हे आता सर्व व्यापाऱ्यांना समजून चुकले आहे. त्यामुळे सद्याच्या परिस्थितीत भाजी विक्रेते, मच्छि विक्रेते हे सर्व ठिकाणी जागा मिळेल तिथे बेशिस्तपणे आपल्या मालाची विक्री करत आहेत.
माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांनी बोलविलेल्या एमआयडीसी रेस्ट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीमध्ये आपण मागितलेला रु. ५ कोटी ८४ लाख निधी आपण केलेल्या विनंतीनुसार कुडाळ शहरातील ३४ कामांसाठी मंजूर करून दिला. पण भंगसाळ नदी सुशोभिकरण करण्याकरिता नगरपंचायतीची आवश्यक असणारी मंजूरी देण्याचे कबूल केलेले आश्वासन पाळले नाही. गेल्या ५ वर्षामध्ये कुडाळ शहराची एवढी बकाल परिस्थिती करून ठेवली आहे की, कुडाळ शहरात प्रवेश केल्यानंतर नगरपंचायतीच्या ताव्यातील एकही रस्ता चालण्यायोग्य सुद्धा ठेवलेला नाही. २ वर्षात तयार करण्यात आलेले रस्तेसुद्धा खड्डे पडून वाहून गेलेले आहेत. आपण दिलेल्या आश्वासनानुसार गार्डन, गांधीचौक सुशोभिकरण व इतर आश्वासनांचे काय झाले……?
आपण आपल्या पक्षातील सर्व नगरसेवकांना घेऊन रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय येथे कुडाळ नगरपंचायतीचे माजी मुख्याधिकारी व सद्याचे राजापूर नगरपंचायतीचे असलेले मुख्य अधिकारी श्री. ढेकळे यांच्याविरोधात केलेल्या तक्रारी व जाहीर केलेले घंटानाद आंदोलन कोणत्या अंतर्गत अॅडजेस्टमेंटमुळे बारगळले की, आपल्याला आपल्या नगरसेवकांची साथ मिळाली नाही.
यामुळे मागच्या पत्रकामध्ये आपल्याला दिलेली उपमा ‘अंधेर नगरी चौपट राजा’ ही आपल्याला योग्यरित्या लागू होत आहे, हे आपण सिद्ध केले आहे. असे शिवसेना कुडाळ शहरप्रमुख संतोष शिरसाट यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

