मालवणशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने वॉटरस्पोर्ट्स सुरूच ठेवणार!

▪️बंदर विभागाच्या ‘बंदी’ आदेशाविरोधात मालवणातील पर्यटन व्यवसाईक संतप्त..

▪️बंदर अधिकाऱ्याना घेराव घालत शेकडो पर्यटन व्यवसाईकांनी स्पष्ट केली भूमिका..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : मालवण

🎴मालवण,दि.०५: जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आम्ही वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय सुरू केले. कोरोना काळात ठप्प असलेला वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय पुन्हा एकदा पूर्वपदार येत असताना बंदर विभाग आडमुठे धोरण राबवून आमच्यावर कारवाई करणार असेल तर खुशाल कारवाई करा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने नियमांचे पालन करत आम्ही आमचे व्यवसाय सुरू ठेवणार. अशी भूमिका मालवणातील वॉटर स्पोर्ट्स व्यवसाईकांनी बंदर अधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केली.

केवळ बंदर विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून कोरोना खबरदारी नियमावली प्राप्त नाही असे कारण पुढे करून वॉटर स्पोर्ट्स बंद करा असे आदेश दिले जात असतील. अनेकांचे रोजगार हिरावले जात असतील तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही व्यवसाय सुरूच ठेवणार. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व नियमांचे पालन करून आम्ही केलेला व्यवसाय, दिलेली पर्यटन सेवा बंदर विभाग अनधिकृत ठरवत असेल तर आम्ही कारवाईस तयार आहोत. मात्र वॉटर स्पोर्ट्स सुरूच राहणार असेही पर्यटन व्यवसाईकांनी स्पष्ट केले आहे.

बंदर विभागाच्या बंदी आदेश व कारवाई भूमिके विरोधात मालवण, तारकर्ली, देवबाग, दांडी, चिवला येथील शेकडो पर्यटन व्यवसाईकांनी बंदर कार्यालयावर धडक देत, भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, वरिष्ठांच्या आदेशाने वॉटर स्पोर्ट्स बंद ठेवण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर यांनी सांगितले.

आम्ही कर्जबाजारी झालो आहोत. पुन्हा बंदी आल्यास आमच्यावर उपासमारीची वेळ येईल. पूर्वपदावर आलेले पर्यटन ठप्प होईल. या परिस्थितीचा विचार करता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कोरोना खबरदारी नियमानुसार पर्यटकांच्या सुरक्षेची सर्वाधिक काळजी घेत पर्यटन व्यवसाय सुरू ठेवणार असल्याचे पर्यटन व्यवसाईकांनी स्पष्ट केले.

यावेळी पर्यटन व्यवसाईक अन्वय प्रभू, सतीश आचरेकर, मनोज मेथर, फ्रान्सिस फर्नांडिस,बाबली चोपडेकर, राजन कुमठेकर, मनोज खोबरेकर, रमेश कद्रेकर, वैभव खोबरेकर यासह शेकडो व्यवसाईक उपस्थित होते. महेश जावकर, दिलीप घारे यासह काँग्रेसचे बाळू अंधारी व अरविंद मोंडकर यांनीही व्यवसाईकांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. बंदर विभागाच्या मार्गदर्शक सूचना (एसओपी) सोमवार पर्यत मिळण्यासाठी आम्हीही मंत्री स्तरावर पाठपुरावा करत असल्याचे मोंडकर यांनी सांगितले.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!