वैभववाडीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

नवीन मतदान नोंदणी व मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम गावागावात जाहीर..

▪️नागरिकांनी मोहिमेत सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे; तहसीलदार रामदास झळके यांचे आवाहन

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.०५: १८ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार आहे. नवीन मतदान नोंदणी कार्यक्रम व मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम गावागावात जाहीर झाला आहे. या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होत प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन वैभववाडी तहसीलदार रामदास झळके यांनी केले आहे.

येथील तहसील कार्यालयात मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी शिवसेना तालुकाध्यक्ष मंगेश लोके,  भाजपाचे प्रतिनिधी अनंत फोंडके, राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष दादामियाँ पाटणकर,  राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मनसे तालुकाध्यक्ष सचिन तावडे, बसपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत जाधव तसेच नायब तहसीलदार अशोक नाईक, नायब तहसीलदार सौ. कासकर व कर्मचारी उपस्थित होते.

वैभववाडी तालुक्यामध्ये निवडणूक मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम व विशेष जनजागृती कार्यक्रम १ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत जाहीर करण्यात आला आहे. या विशेष जनजागृती कार्यक्रमांतर्गत गावात मतदार यादीचे वाचन करणे, मयत मतदारांचे नमुना नं. ७ भरून घेणे, दुबार मतदारांचे नमुना नं. ७ भरून घेणे,  स्थलांतरित / कायम स्थलांतरीत मतदारांची नावे कमी करणेकरिता नमुना नं. ७ भरून घेणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे, मतदारांच्या नावातील दुरुस्ती करणे, तसेच छायाचित्रं नसलेल्या मतदारांचे नमुना नंबर ८ भरून घेणे, छायाचित्रं नसलेले मतदार आढळ होत नसेल किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित झाले असलेस पंचयादीसह नमुना नं. ७ भरून घेणे. याबाबतची माहिती व मार्गदर्शन तहसीलदार श्री. झळके यांनी केले.

१५ डिसेंबर पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. फॉर्म स्विकारण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर आहे. मतदार यादी प्रसिद्धीचा दिनांक १५ जानेवारी २०२१ आहे.

तसेच ५ डिसेंबर व ६ डिसेंबर तसेच १२ डिसेंबर व १३ डिसेंबर या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळी ११ ते सायं. ४ वाजेपर्यंत उपस्थित राहून मतदारांचे नमुना नंबर ६,७,८ व ८ अ फॉर्म वाटप व स्वीकारण्याचे काम करणार आहेत.

तरी तालुक्यातील नागरिकांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा. असे आवाहन तहसीलदार श्री. झळके  यांनी केले आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!