महाराष्ट्रराजकीय

🟥 तेजस ठाकरे सक्रिय राजकारणात प्रवेशासाठी सज्ज? किशोरी पेडणेकरांच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चर्चांना उधाण!

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मुंबई, दि-०७:- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. अशातच माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे पूत्र तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरू आहे.तेजस ठाकरे राजकारणात येणार असल्याच्या चर्चा अनेकदा ऐकायला मिळाल्या आहेत. परंतु, तेजस ठाकरे यांना राजकारणापेक्षा वाईल्डलाईफ फोटोग्राफीमध्येच जास्त रस असल्याचं नेहमी सांगितलं जातं. गेल्या वर्षी ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याच्या वेळी अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु, तेजस ठाकरे यांचे मोठे बंधू आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी या सगळ्या अफवा असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

तेजस ठाकरे यांचा आज २७ वा वाढदिवस आहे. यानिमत्त शिवसैनिकांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. अशातच मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही तेजस ठाकरे यांना शुभेच्छा देणारं ट्वीट केलं आहे. तसेच हे ट्वीट करताना त्यांनी तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.

 

किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की निसर्गप्रेमी, वाइल्डलाईफ फोटोग्राफर, जैवविविधतेबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतलेले सुप्रसिद्ध अभ्यासू वन्यजीव संशोधक तेजस उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! ही तोफ लवकरच धडाडणार, विरोधकांसह गद्दारांच्या छातीत धडकी भरवणार!

खरंतर वन्यजीव संशोधन हे तेजस ठाकरे यांचं आवडतं क्षेत्र आहे. त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या प्राण्यांच्या प्रजाती शोधून काढल्या आहेत. अलिकडेच त्यांनी हिरण्यकेशी मासा, गोड्या पाण्यातला दुर्मिळ खेकडा, पाल आणि सापाच्या नवीन प्रजाती शोधून काढल्या आहेत.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!