🟥तहसील रेकॉर्ड रुममध्ये सीसीटीव्ही
🟥पाच तहसीलदारांना वाहन खरेदीसाठी निधी
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.०२: जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रूम सुरक्षित रहावा, त्याठिकाणी कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी सर्व तहसील कार्यालयांच्या रेकॉर्ड रुममध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी मिळण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील पाच तहसीलदार व एक प्रांताधिकारी यांच्यासाठी शासकीय वाहन खरेदीसाठी जिल्हा नियोजनमधून निधी मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. वेंगुर्ले तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या रेकॉर्ड रुममध्ये खाडाखोड झाल्याचा प्रकार घडला होता. याची गंभीर दखल घेण्यात आली असून असा पुन्हा प्रकार होऊ नये, याची दक्षता घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे रेकॉर्ड रूममध्ये बसवले जाणार आहेत. तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रुममध्ये अनेक वर्षांपासूनची माहिती दप्तरी असते. ही माहिती अतिशय महत्वाची असून त्यामध्ये कोणताही फेरफार होऊ नये, माहिती कायमस्वरुपी अद्ययावत राहवी व व्यवस्थित राहवी, याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील आठही तहसील कार्यालयांच्या रेकॉर्ड रुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी आवश्यक लागणारा निधी जिल्हा नियोजनमधून उपलब्ध केला जाणार असून त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील पाच तहसीलदार व एक प्रांताधिकारी यांना शासकीय वाहनाची व्यवस्था नाही. त्यामुळे महसूल खात्याचे काम करताना फार अडचणी येत होत्या. त्याकरिता तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांना शासकीय वाहन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजनमध्ये निधी देण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रस्ताव ठेवण्यात आला होता. जिल्हा नियोजनमधून महसूल यंत्रणेसाठी पाच टक्के निधी खर्च करता येत असल्याने पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजनमधून तहसीलदार व प्रांताधिकारी यांना शासकीय वाहन खरेदीसाठी निधी मंजूर करून दिला आहे. लवकरच या निधीतून वाहन खरेदी करून तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांना शासकीय वाहने उपलब्ध करून दिली जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

