🟥 जुगार धंद्याबाबत राजापूर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर
🎴राजापूर,दि-०२ :- आज रोजी श्रीधर आकाराम पाटेकर वय ३२ वर्षे रा. कोळंब मधलीवाडी ता. राजापूर जि. रत्नागिरी हा पाचल जवळेथर फाटा येथे असणाऱ्या एका टपरीच्या आडोशाला गैरकायदा, बिगर परवाना कल्याण मटका जुगाराचा खेळ खेळत व खेळवित असतो अशी गोपनीय माहिती राजापूर पोलीसांना प्राप्त झाली. त्या अनुषंगाने राजापूर पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. तळेकर, पो.कॉ. पाटील, पो. कॉ. माने आणि दोन पंच असे पाचल जवळेथर फाटा येथे गेले. सदर ठिकाणी असणाऱ्या एका टपरीच्या आडोशाला थांबून दुपारी दीडच्या सुमारास एक इसम आपल्या हातातील पेनाने एका पावती पुस्तकावर काहीतरी लिहीताना दिसला. त्याचा पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी त्यास धावत जाऊन जागीच थांबवून त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या पावती पुस्तकाची खात्री केली . त्याच्याजवळ एक सफेद व एक पिवळ्या कागदाचे पावती पुस्तक मिळून आले. त्या पुस्तकांच्या प्रत्येक पावतीवर कल्याण असे मराठीत लिहिलेले व छापील क्रमांक आढळून आले. त्यावर आकडेमोड सुद्धा केलेली दिसुन आली. त्यावरून तो कल्याण मटका जुगाराचा खेळ चालवित असल्याची पोलिसांची खात्री झाली.
राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल घाटगे वय ३२ वर्षे, यांनी तक्रार दिली असून आरोपी श्रीधर पाटेकर विरुद्ध राजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे. आणि त्यांनी अशाप्रकारच्या सर्वच अवैध धंद्यांवर करडी नजर ठेवून कठोरात कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित*
*इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
⭕ *#बेसिक बी.एस.सी नर्सिंग*
( *चार वर्षांचा कोर्स*)
*#जी. एन. एम. (तीन वर्षांचा कोर्स)*
*@ *ए .एन. एम.(दोन वर्षांचा कोर्स)*
⭕ *#गावरान साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज*
🔼 *#भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुशुस्रा व परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज*
*#वर्ग लॅब ग्रंथालय हॉल वसतीगृह मेस मैदान आधी साऱ्या सुविधांसह सुसज्ज*
*#शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणारे*
🔼 *@सिंधुदुर्ग मुंबई पुणे कोल्हापूर सावंतवाडी मिरज अशा ठिकाणच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिकांचा अनुभव असलेले नर्सिंग कॉलेज*
*@मुंबई, पुणे व कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरातील नामांकीत रुग्णालयात Campus Interview द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी*
✨ *#आम्हाला अभिमान आहे आमचे विद्यार्थी जोडले गेलेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थां मध्ये……*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
📞 *प्रवेशासाठी संपर्क* *7972887493/9834312805 /7499921089*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

