कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष कोणाच्या पाठीशी हे आव्हाडांच्या दौऱ्यात नक्की दिसेल -अमीत सामंत

जिल्ह्यतील राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आहे हे विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी नक्की दिसेल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी पक्ष सावरण्याकरता स्वतः मैदानात उतरून झुंज देण्याचा निर्णय घेतला.त्यांनी तत्काळ विरोधी पक्षनेतेपद जितेंद्र आव्हाड यांना दिले. ते आता सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहे आहेत. जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दौऱ्यादरम्यान शरद पवार साहेब यांच्या मागे मोठ्या संख्येने पक्षसंघटना असल्याचे दिसेल व जिल्ह्यातील पक्ष एकसंघ असल्याचे दिसेल असे म्हटले आहे. शरद पवार साहेब यांचे कोकणावर असलेले प्रेम, त्यांनी दिलेली शंभर टक्के फलोत्पादन योजना, जिल्हा मुख्यालय, जिल्हा पर्यटनाला विशेष योगदान त्यामुळेच जिल्हा त्यांच्यामागे असल्याचे नक्की दिसेल. सिंधुदुर्ग आणि कोकण यांचं नातं त्यामुळे केवळ शरद पवार साहेब महाराष्ट्राचे आणि पर्यायाने सिंधुदुर्गचे भाग्यविधाते म्हणून त्यांच्या व पक्षाच्या बाजूने या जिल्ह्यातील पक्ष संघटना एक संघ राहील त्याला येथील जनता साथ देईल हे उद्या होणाऱ्या सभेत दिसेल असेही श्री.यांनी यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!