कुडाळकोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

कुडाळ येथील तरुणाची गळफासाने आत्महत्या

*🟥कुडाळ येथील तरुणाची गळफासाने आत्महत्या*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कुडाळ, दि.११:* कुडाळ एमआयडीसी-वरची कुमारवाडी येथील आकाश अशोक साळगावकर (३२) यांनी आपल्या राहत्या घरात सीलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी २ ते ३.४५ च्या मुदतीत घडली. त्यांच्या आकाश साळगावकर आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. कुडाळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी ‘नोंद केली आहे. याबाबतची खबर आकाश यांचे मामा दीपक केशव कुंभार (रा. पिंगुळी-करंगुटकरवाडी) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. या घटनेने कुडाळ एमआयडीसी व वरची कुंभारवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आकाश यांची आई व बहीण सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेली होती. त्यांचे वडील टेलरिंग काम करतात. ते दुपारी दोनच्या सुमारास शिवून झालेले कपडे देण्यासाठी कुडाळ बाजारपेठेत गेले होते. आकाश एकटेच घरी होते. आपण कोल्हापूर येथे वाहन घेऊन जाणार असल्याचे त्यांनी वडिलांना सांगितले होते. दुपारी ३.४५ च्या सुमारास त्यांचे वडील बाजारपेठेतून घरी आले असता घराचा दरवाजा आतून बंद होता. मुलगा आत- झोपला असेल म्हणून त्यांनी दुसऱ्या खोलीचे शटर उघडून घरात प्रवेश केला. तेव्हा आकाश यांचा मृतदेह आतील मधल्या खोलीत सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत दिसला. हे पाहताच त्यांनी आरडाओरड करताच माजी सरपंच प्रशांत राणे यांनी तेथे धाव घेतली. नंतर त्यांनी ही घटना आकाश यांचे मामा दीपक यांना सांगितली. नंतर कुडाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हवालदार सचिन गवस व योगिता राणे यांनी पंचनामा केला. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आकाश चारचाकी खासगी वाहनांवर चालक म्हणून काम करायचे, ते अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!