सिंधुदुर्गात व महाराष्ट्रातील इतरत्र जिल्ह्यांत होणाऱ्या अवैध मद्य पुरवठ्याबाबत राज्यमंत्र्यांनी बोलावली बैठक..
▪️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलच्या लढ्याला यश; आता आर पार ची लढाई..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे
🎴सावंतवाडी,दि.०२: कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ने गोव्यातून सिंधुदुर्गात व महाराष्ट्राच्या इतरत्र जिल्ह्यात पुरवठा होणारा अवैध मद्य पूरवठ्याबाबत सातत्याने आवाज उठविल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी याबाबत ठोस पावले उचलली आहेत. तसेच राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी याबाबत राज्यातील जिल्हा बार संघटनेचे नेते व अधिकाऱ्यांची याबाबत विचार विनिमय करण्यासाठी खास बैठकीचे आयोजन गुरूवार दि. ४ नोव्हेंबर रोजी केले आहे. हे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या लढ्याला मिळालेले यश आहे.
कोकण लाईव्ह ने गोव्यातून सिंधुदुर्गात व महाराष्ट्राच्या इतरत्र जिल्ह्यात होणाऱ्या अवैध मद्य पुरवठा बाबत आवाज उठवला होता, यानंतर राज्यातील झोपी गेलेले राज्य उत्पादन शुल्क अधिकारी जागे झाले. राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी यासंदर्भात ठोस पावले उचलत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या राज्यातील बार संघटनाही या अवैध मद्य पुरवठा बाबत आक्रमक झालेत. व त्यांनी याबाबत उठाव करायला सुरुवात केली. अखेर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी यासंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी कोल्हापूर बार संघटनेने पुढाकार घेतला.
या बैठकीला कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यात मद्य विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेखर गाड, जितू पंडीत, सर्वेश पाटकर, अवि सामंत व कोल्हापूर मद्य विक्रेता संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत इतर राज्यातून होणाऱ्या अवैध मद्य पुरवठा बाबत विचार करून तातडीची उपाययोजना केली जाणार आहे. हे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चे मोठे यश असल्याचे प्रतिक्रिया बार संघटनांनी दिल्या आहेत.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

