काळ्या काचां वर करून फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करा..

▪️या गाड्यांतूनच होतेय अवैद्य मालाची तस्करी..

▪️गोव्यातून दारू, गांजा, गुटखा, होतोय या गाड्यांमधून पुरवठा..

▪️सिंधुदुर्ग पोलिस व परिवहन खाते आता तरी जागे होणार का; कोकण लाईव्ह चा सवाल

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे

🎴सावंतवाडी,दि.३१: गोवा राज्यातून सिंधुदुर्गात दारूची वाहतूक केली जाते त्या वाहतुकीसाठी मारुती एट हंड्रेड, स्विफ्ट कार, झेन कार चा वापर सर्रास केला जातो आणि या सर्व गाड्यांच्या काचां काळ्या रंगाच्या केलेल्या असतात. उच्च न्यायालयाने चारचाकी गाड्यांच्या काचां पारदर्शक असाव्यात. असे आदेश देऊन सुद्धा पोलीस, आरटीओ याची अंमलबजावणी सिंधुदुर्गात करताना का दिसून येत नाही हा संशोधनाचा विषय आहे.

दारू तस्कर आपल्या अशा गाड्यांचा अनैतिक धंद्यासाठी वापर करत असल्याने व पोलिसांचा, परिवहन खात्याचा, वरदहस्त   असल्याने चोरटी वाहतूक व अनैतिक धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत, असे आमचे स्पष्ट मत आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष करून कर्नाटक राज्यामध्ये काळ्या काचां असलेली गाडी आढळली की, त्या गाडीच्या काचेवर ब्लेड मारले जाते व काळी फिल्म काढून टाकून सदर गाडी मालकाला दंड आकारला जातो. तशी पद्धत सिंधुदुर्गात का नाही. हा आमचा प्रश्र आहे. सर्वसामान्य माणसाच्या गाड्यांच्या काचां काळ्या असल्या की, त्या गाड्या थांबून त्यांना दमदाटी केली जाते, त्यांना नियम समजावून सांगितला जातो. मात्र, तोच नियम अनैतिक धंदे करणाऱ्यांना समजावून का सांगितला जात नाही. त्यांच्या गाडीच्या काचांवर ब्लेड का मारले जात नाही. हा आमचा प्रश्न आहे.

अल्पवयीन मुलींना पण अशाच गाड्यांमधून अन्यत्र नेऊन तिचे कोमार्य भंग केले जाते. क्षणिक सुखासाठी पैशासाठी या मुली बळी पडतात, पैशाच्या आहारी जातात. त्याला गरिबी हा शाप असतो. अशाच गरीब मुलींना हेरले जाते. असा आमचा दाट संशय आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील परिवहन खाते, पोलीस खाते, अशा गाड्यांवर कधी पासून कारवाई करतात, हे आता पहावे लागणार आहे.

या गाड्यांवर कारवाई निव्वळ त्या गाड्यांमधून दोन नंबरची वाहतूक होत असल्याने होत नाही असा आमचा थेट आरोप आहे. अन्यथा १० ते १५ गाड्या काळ्या काचां वर चढवून शहरात फिरतात. त्या  पोलिसांनी कधीच जप्त करून कारवाई केली असती. मात्र, ही कारवाई होत नसल्याने या मागे काहीतरी काळेभोर असावे असा आमचा संशय आहे. व या काळ्या काचांं लावलेल्या गाडीतूनच विविध प्रकारची अनैतिक वाहतूक होत असल्याचा संशय आहे. त्यात गोव्याहून घेऊन येणारा चरस, गांजा, गुटखा, इतर अंमली पदार्थ हे अशा प्रकारच्या काळ्या काचां वर चढलेल्या  गाडी मधूनच तस्करी होत आहे. आणि हे सर्व शासकीय यंत्रणेला माहिती असून देखील ती मोठा हप्ता मिळत असल्याने चिडीचुप आहे.

आरटीओ विभागाला व  पोलिसांना जर खरोखरच प्रामाणिकपणे काम करायचे असेल तर पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या चारचाकी गाड्यांच्या काचांवर काळी फील्म लावून त्या काचां वर चढवून‌ फीरणाऱ्या सर्व वाहनधारकांवर कारवाई करावी व आपले शौर्य दाखवावे, अशी आमची विनंती आहे.

गाडी चालवण्याचा परवाना नाही, गाडीची कागदपत्रे अपुरे आहेत, पीयूसी नाही, ट्रिपल सीट आहे, अशी वेगवेगळी कारणे दाखवून शासनाच्या महसुलात भर घालणारे पोलीस या काळ्या काचां चढवून फिरणाऱ्यांवर एवढे खुश का आहेत, हे  समजायला मार्ग नाही. त्यामुळे पोलिसांना व परिवहन विभागाला कारवाई कशी करायची असेल तर अशा काळ्या काचां चढवून फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करावी अशी आमची रास्त मागणी आहे.

गोव्यातून सिंधुदुर्गात येताना तपासणी नाके लागते, पोलीस स्टेशन लागते. मात्र, या ठिकाणी अशा वाहनांवर कोणतीही कार्यवाही झाल्याचे अद्यापपर्यंत ऐंकीवात नाही. त्यामुळे पोलिसांचे आणि वाहन चालविणाऱ्या तस्करांचे साटेलोटे असावेत, असा आमचा दाट संशय आहे. या व्यवहारात परिवहन खात्याचे अधिकारीही अडकल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*💥 प्रतिभा संपन्न कोकणच्या प्रत्येक हालचालींवर अतिसुक्ष्म नजर ठेवणारे कोकणातील सुपरफास्ट चॅनल….🔥*

🖥️ *कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज….💥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!