जिल्हा बँक ही शेतकऱ्यांच्या घामातून उभी झालेली बँक.. अध्यक्ष सतीश सावंत.
जिल्ह्यात १८ हजार शेतकऱ्यांना जवळपास ३४ कोटी रुपयांची कर्ज माफी…
कार्यकारी संपादक – आनंद धोंड
सावंतवाडी:१- जिल्हा बँक ही शेतकऱ्यांच्या घामातून आणि कष्टांतून उभी झाली आहे. जिल्हा बँकेचे काही जणांकडून बदनामी करण्याचे काम सुरू आहे. मात्र बँकेने यापूर्वी चांगलं काम केलं आहे आणि पुढेही असेच करत राहू.
कोणीही कितीही आरोप कले तरी त्यांच्या आरोपांना वेळ आल्यावर उत्तर देऊ, निवडणुका तोंडावर आल्याने असे आरोप-प्रत्यारोप होतच राहणार. मात्र जे आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत त्यांनी अशी टीका करणे हे कितपत योग्य आहे, असा टोलाही यावेळी शिवसेनेचे नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी विरोधकांना लगावला.