जिल्हा बँक ही शेतकऱ्यांच्या घामातून उभी झालेली बँक.. अध्यक्ष सतीश सावंत.
जिल्ह्यात १८ हजार शेतकऱ्यांना जवळपास ३४ कोटी रुपयांची कर्ज माफी होणार…
सावंतवाडी-जिल्हा बँक ही शेतकऱ्यांच्या घामातून आणि कष्टांतून उभी झाली आहे. जिल्हा बँकेचे काही जणांकडून बदनामी करण्याचे काम सुरू आहे मात्र बँकेने यापूर्वी चांगलं काम केलं आहे आणि पुढेही असेच करत राहू कोणीही कितीही आरोप करूनदेत त्यांच्या आरोपाला वेळ आल्यावर उत्तर देऊ, निवडणुका तोंडावर आल्याने असे आरोप-प्रत्यारोप होतच राहणार. मात्र जे आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत त्यांनी टीका करणे हे कितपत योग्य आहे, असा टोलाही यावेळी शिवसेनेचे नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी विरोधकांना लगावला.


सतीश सावंत साहेब नुसती कर्जमाफी दाखवु नका.उत्पन्न करावं लागेल.नाहितर उद्या बॅंक दिवाळखोरीत असेल.बॅंक चालवा.