रत्नागिरीराजकीयशासकीयसामाजिक

ओमळी येथील बंद अवस्थेमध्ये असलेले प्राथमिक आरोग्य सुरू; ‘मनसे’च्या पाठपुराव्याला यश

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.२८: ओमळी येथील ग्रामस्थांनी सर्वच राजकीय पक्षांकडे भेटी घेत आपल्या समस्या सोडवाव्यात अशी विनंती केली होती. परंतु ह्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. लॉकडाऊन च्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरून काम केले आहे हे पाहून येथील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चिपळूण तालुकाध्यक्ष संतोष नलावडे ह्यांची भेट घेतली व आपल्या समस्या मांडल्या. ह्यात प्रामुख्याने रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि बंद पडलेले प्राथमिक आरोग्य केंद्र ह्या बाबतीत पाठपुरावा करून आम्हास न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली होती. ह्यानंतर त्यांच्या विनंतीला मान देऊन पक्षाचे सरचिटणीस तथा खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष संतोष नलावडे ह्यांनी आपले सहकारी तालुका उपाध्यक्ष सुनिल हळदणकर, अभिनव भूरण, मनविसे तालुका अध्यक्ष अमोल अवेरे, मनविसे तालुका उपाध्यक्ष गुरुनाथ नागे, संतोष हातीसकर, निकेतन हतिस्कर, प्रतापराव भोसले, सचिन कदम, संजय रसाळ, सांकेश कदम, मिलिंद देसाई, विनय पवार, संदीप रसाळ, जितेंद्र जाधव, ओमकार दळवी, प्रशांत चव्हाण, संकीर्ण मयेकर यांच्यासोबत दिनांक १२ नोव्हेंबर रोजी ओमळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धडक देत तेथे असलेल्या गैरसोयीे तसेच काही कालावधी साठी बंद अवस्थेत असलेले हे आरोग्य केंद्र लवकरात लवकर चालू करावे असा अल्टिमेटम दिला होता. आणि ह्याचा यश्वस्वी पाठपुरावा करून तालुकाध्यक्ष संतोष नलावडे ह्यांनी ह्यातील पहिली मागणी पूर्णत्वास नेली. हे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाल्याने नागरिकांची होणारी परवड थांबणार असल्याचे सांगत येथील ग्रामस्थांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार व्यक्त केले. हे आभार स्विकारण्यासाठी पक्षाच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात तालुका उपाध्यक्ष सुनिल हळदणकर उपस्थित होते.

*_🧰💡आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला नाही कशाला निराश होताय???…निश्चिंत रहा..मुक्त विद्यापीठ आपणास तंत्र शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे🤩😍_*

   *🧰डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन🧰*
_तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी_

💫आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा!

*🏃🏻‍♂️प्रवेश सुरु*
*सावंतवाडी अभ्यास केंद्र संपर्क*
*_📱9422896699_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!