केसरी येथील स्वयंभू देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव २९ नोव्हेंबर २०२० रोजी..
प्रतिनिधी – त्रिविक्रम सावंत
दाणोली:२७ – केसरी येथे स्वयंभू देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव २९ नोव्हेंबर २०२० रोजी साजरा होणार आहे. देवसू ,दाणोली, आणि केसरी या तीन गावच्या अधिपती असलेल्या श्री देव स्वयंभूच्या वार्षिक उत्सवासाठी तिन्ही गावासहीत नजीकच्या गोवा कोल्हापूर बेळगाव भागातून मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित असतात मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे हा जत्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करायचा निर्णय तिन्ही गावच्या मानकरऱ्यांनी एकत्र येऊन घेतलेला आहे या जत्रोत्सवात भाविकांनी गर्दी न करता सर्व शासकीय नियम व नियमावली पाळून दर्शन घ्यावे असे आवाहन तीनही गावच्या मानकर्यांनी केले आहे या जत्रोत्सवात मंदिरा च्या अंगणात केलेली दिव्यांची रोषणाई फारच आकर्षक असते तसेच सूर्यास्ताच्या वेळी होणारी देवाची आरती बघण्यासाठी भाविकांची झुंबड उडते.