आपली अस्मिता जपून फक्त कौटुंबिक संसाराच्या गाड्यात रुतून न बसता स्त्री ने प्रगल्भ आणि बंडखोर व्हायला हवे–उर्मिला चाकूरकर
🟥आपली अस्मिता जपून फक्त कौटुंबिक संसाराच्या गाड्यात रुतून न बसता स्त्री ने प्रगल्भ आणि बंडखोर व्हायला हवे–उर्मिला चाकूरकर
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
🎴 सावंतवाडी,दि.४ एप्रिल-आपली अस्मिता जपून फक्त कौटुंबिक संसाराच्या गाड्यात रुतून न बसता स्त्री ने प्रगल्भ आणि बंडखोर व्हायला हवे. स्त्रीचा आवाज अजूनही दाबला जात आहे अशा स्थितीत तिला व्यक्त होण्यासाठी स्त्रीप्रधान कार्यक्रम आणि व्यासपीठ निर्माण होणे आवश्यक आहे.अशा व्यासपीठातूनच स्त्रीने बंडखोर प्रवृत्ती स्वीकारायला हवी, असे आवाहन विभागीय कवयित्री संमेलनाच्या अध्यक्षा, जेष्ठ कवयित्री उर्मिला चाकुरकर यांनी केले.
सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात आरती मासिक, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा व श्रीराम वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने १६ वे विभागीय कवियत्री संमेलनाचे उद्घाटन कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्षा नमिता कीर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर संयोजिका, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ज्येष्ठ लेखिका उषा परब, प्रा. दीपा ठाणेकर, अनुराधा म्हापणकर, प्रा. आदिती बर्वे ,चित्रा श्रीसागर, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे तालुका अध्यक्ष अँड संतोष सावंत, श्रीराम मंदिरचे उपाध्यक्ष डॉ जी ए बुवा, सचिव प्रतिभा चव्हाण, जिल्हा सचिव भरत गावडे, कवी विठ्ठल कदम, अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, नकुल पार्सेकर, रामदास पारकर, अँड प्रकाश परब, दीपक पटेकर, मेघना राऊळ, ऋतुजा भोसले, प्रज्ञा मातोंडकर ,वाय पी नाईक,सलीम तकिलदार, स्मिता परब ,स्नेहल कदम, कल्पना बांदेकर ,मंगल नाईक ,वृंदा कांबळी ,मंजिरी मुंडले, मीनाक्षी आळवणी आदी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षा श्रीमती चाकूरकर म्हणाल्या, महिला अजूनही दबावाखाली वावरत आहे स्त्रियांनी हा दबाव झुगारून बंडखोर प्रवृत्ती ठेवायला हवी. जगातील जे साहित्य आहे त्यादृष्टीने अभ्यास करायला हवा. नवे तंत्रज्ञान नवे विचार आचार याचा विचार करून स्त्रीने कविता कथालेखन यादृष्टीने लिखाण करायला हवे.
यावेळी उद्घाटक कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर म्हणाल्या, कवितेचा प्रवास हा बाराव्या शतकापासून आता एकविसाव्या शतकापर्यंत चालला आहे कविता सहज मानता येत नाही कवितेचा प्रवास फार मोठा आहे कविताही समाजव्यवस्था आणि परिसरातील घडलेल्या घटनांवर योग्य पद्धतीने विचार आचार यामधून व्यक्त होणारी भावना ही कवितेत मानली जाते फक्त इकडचे तिकडचे वाक्यरचना करून कविता होत नाही त्यासाठी भावना आणि माणुसकी फार महत्त्वाचे आहे प्रत्येकाने लिहिते बोलते व्हायला हवे.
यावेळी संयोजिका उषा परब यांनी स्त्रियांना वेगळे व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी हे कवी संमेलन आयोजित करत आहोत सोळा वर्ष हे कविसंमेलन चांगल्या पद्धतीने आयोजित केले जात आहे स्त्रीला वेगळे व्यासपीठ निर्माण व्हावे यामागचा हेतू आहे यावेळी विविध निमंत्रित कवियत्री आपल्या कविता मांडल्या
यावेळी उपस्थितांचे स्वागत उषा परब, डॉ जी ए बुवा, अँड संतोष सावंत यांनी केले. यावेळी महिलांचे योग प्रशिक्षण वर्ग उत्तम रित्या चालवणाऱ्या संगीता तुपकर यांच्या ग्रुपचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी शिरसाट तर परिचय मेघना राऊळ, शीतल परब यांनी केला तर आभार प्रतिभा चव्हाण यांनी मानले.
———————————————
*🚩गुढीपाडवा बंपर धमाका…🤩बंपर धमाका…🤩बंपर धमाका…😍*
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर *फक्त १०१ रुपये* भरा आणि खरेदी करा… *मोबाईल📱, LED TV🖥️ व AC📼* आणि सोबत मिळवा *आकर्षक🎁* भेटवस्तू…!🤩
*💿म्युझिक कॉर्नर📀*
_📱इलेक्ट्रॉनिक्स //मोबाईल शॉपी🎴_
*_गुढीपाडवा ते अक्षय तृतीयेपर्यंत खास धमाका ऑफर…!🎁💥🎊_*
*📱आमच्या येथे उपलब्ध स्मार्टफोन :-*
▪️iPhone▪️1plus
▪️ml ▪️realme
▪️vivo ▪️oppo
▪️SAMSUNG
*_🏏 IPLमॅच ची मजा घ्या थंड वातावरणात… आमच्या स्पेशल जोडी ऑफर मध्ये !_*
▪️33,000/- किंमतीचा 32 ” TV + COOLER मिळावा फक्त 16990 रुपयात…
▪️52, 200/- किंमतीचा 43 ” TV + COOLER मिळवा फक्त 26,990 रुपयात…
▪️62, 000/- किंमतीचा 53 ” TV + COOLER मिळवा फक्त 38, 900 रुपयात…
*📡DISH TV 2499/- FULL SET 6 MONTHS FREE😍*
*🛑ग्राहकांच्या उदंड प्रतिसाद व मागणी नुसार आता आपल्या म्युझीक कॉर्नर येथे AC सुद्धा उपलब्ध…!*
▪️VOLTAS▪️ Haier
▪️LLOYD▪️BLUE STAR
▪️SAMSUNG
*🛑आमच्या येथे 0% व्याजदरात उपलब्ध फायनान्स:-*
🔹SAMSUNG FINANCE
🔸BAJAJ FINANCE
🔹TVSCREDIT
*👉 (टीप:- अटी व शर्ती लागू)*
*🥳ऑफर कालावधी गुढी पाडवा ते अक्षय तृतीया पर्यंत…!*
*🏡आमचा पत्ता व संपर्क:-*
जयप्रकाश चौक, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी
8799978651/ 7719918722
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

