एग्रीकल्चर डिग्री मिळवलेल्या युवकांनी सुरु केला गृहउद्योग
सावंतवाडी न्यू सबनीस वाडा बिरोडकर टेंब येथील संतोष वासुदेव सगम या युवकाने एग्रीकल्चर डिग्री मिळवूनही नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यावर भर देऊन सुहासिनी गृह उद्योग नावाने व्यवसाय सुरू करून अल्पावधीतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना अत्यंत माफक दरात लग्न लग्नकार्यासाठी, वाढदिवस पार्टी, इतर कार्यक्रम, त्यासाठी लागणाऱ्या द्रोण,डिश, पूजेसाठी लागणारे लहान द्रोण, टीशू पेपर, इतर साहित्य ,माफक दरात देऊन दर्जेदार क्वालिटी च्या जीवावर आपल्या सुहासिनी गृहउद्योगा चे नाव केले आहे.
अशा उद्योगात उतरण्याचे धाडस नवयुवक करत नाहीत, कारण या धंद्यावर काही विशिष्ट लोकांची मक्तेदारी असते ,ही मक्तेदारी मोडीत काढणे सोपे काम नसते ,मात्र आपली दिवंगत बहिण सुहासिनी च्या नावाने गृह उद्योग नावाचा व्यवसाय सुरू करून संतोष सगम यांनी एक धाडसी पाऊल टाकले आहे.
या व्यवसायात त्यांनी अनेक युवकांना रोजगार मिळवून दिला व खऱ्या अर्थाने काही विशिष्ट लोकांची या धंद्यातील मक्तेदारी मोडीत काढून ,दर्जेदार साहित्य ,अल्प किमतीत देऊन आपले नाव केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील छोटे मोठे व्यापारी मोठ्या विश्वासाने सुहासिनी गृहउद्योग मध्ये साहित्य खरेदी करून मोठा नफा मिळवत आहेत.
एका मराठी उद्योजकाने अशा प्रकारचे धाडस करणे हे साधे काम नाही ,मात्र संतोष सगम यांनी हे धाडसी पाऊल उचलले व यशाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे, संतोष सगम यांच्या दालनातील साहित्य उत्तम प्रतीचे तर आहेच, शिवाय माफक दरात होलसेल स्वरूपात दिले जाते ,त्यामुळे खेड्यापाड्यातील छोटे व्यापारी सुहासिनी गृह उद्योग कडे वळू लागले आहेत, हा उद्योग सुरू असताना आपल्या परंपरागत शेतीचे आवडही संतोष सगम यांनी जोपासली आहे. जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना सुहासिनी गृहउद्योग मधून उत्तम प्रतीचे साहित्य होलसेल दरात खरेदी करायचे असल्यास त्यांनी ९४२३३०४२५९ किंवा उमेश सावंत ९५७९५६५००१किंवा ७२१८६४१५६० या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.