पारपोली येथे ग्रामपंचायतीच्या नळ योजनेच्या पाण्याच्या पाईप मध्ये मेलेला साप आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ..
प्रतिनिधी – त्रिविक्रम सावंत
पारपोली:२७ – गुरववाडी येथील अमित गुरव यांची नळाची पाईपलाईन बंद झाल्याने दुरुस्तीसाठी खोदले असता त्या पाईप लाईन मध्ये मेलेला सापडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हा साप पाण्याच्या पाईप लाईन मध्ये कुठून घुसला हे तपासणे गरजेचे असून अशा पद्धतीने दूषित पाणीपुरवठा झाल्यास ग्रामस्थांच्या जिवितास धोका झाल्यास याला जबाबदार कोण ?असा प्रश्न गुरववाडीतील ग्रामस्थ करत आहेत ग्रामपंचायतीने त्वरित कारवाई करून पाईपलाईन नादुरुस्त असल्यास त्वरित दुरुस्त करावी अशी मागणी गुरववाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

