कोणी कितीही आंदोलने केली तरी अनधिकृत स्टाँल हटवणारच..संजू परब
खरा बकासुर कोण ?हे जनतेने ओळखले म्हणूनच सावंतवाडी वासियांना नाकारले.
ब्यूरो न्युज – कोकण लाईव्ह ब्रेकिंग
सावंतवाडी:२५- शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी नगरपालिकेवर साधा दगड सोडा सकेरा तरी मारून दाखवा मग पुढे काय होते ते पाहू असा इशारा सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांना दिला
यापुढे नगरपालिकेच्या दरवाज्यावर बसून नागरिकांना त्रास होईल असे कोणी वर्तन केल्यास त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल केले जातील कोणी किती आंदोलने केली ,ढोल वाजवले, घंटा वाजवल्या ,तरी अनधिकृत स्टाॅल आपण काढणारच आणि तशा सूचना आपण प्रशासनाला दिल्या आहेत असे नगराध्यक्ष संजू परब यांनी स्पष्ट केले.
संबंधित स्टॉल धारकाला रक्षाबंधनासाठी स्टॉल देण्यात आला होता. त्यानंतर कोरोना काळ सुरू झाल्याने त्याचा विचार करून वाढीव मुदत देण्यात आली. मात्र ती मुदत संपल्यावर स्टॉल काढायचे सोडून अरेरावी केली गेली त्यामुळे ही कारवाई करावी लागली असे संजू परब यांनी स्पष्ट केले. शहरातील अनधिकृत स्टॉल हटाव होत असलेल्या कारवाईला ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो विरोध करून चुकीच्या लोकांना पाठीशी घालीत आहेत व ते या प्रकाराला खतपाणी घालत असल्याचा आरोप संजू परब केले.
भाजपा पक्ष सर्वसामान्य लोकांचा आहे, गोरगरिबांच्या प्रश्नावर आवाज उठवणार आहे ,तर शिवसेनेने आजतागायत काय केले याचा इतिहास जनतेला माहिती आहे .त्यामुळे उडी सारखे छापे पडत आहेत .म्हणून खरा बकासुर कोण हे जनतेने ओळखले म्हणून नाकारले आहे अशी टीका संजू परब यांनी शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या वक्तव्यावर केली आहे.


Well said sir, keep up