बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या होमपिचवरील शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन फसले.

हिम्मत असेल तर राजीनामा द्यावं निवडून या आदित्य ठाकरे यांचे बंडखोर आमदारांना आवाहन

आमदार केसरकर यांच्या होम पिचवर शिवसेनेचे अयशस्वी शक्ती प्रदर्शन

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या यांच्या सभेला युवकांची संख्या नगण्य

आम्ही शिवसेनेसाठी जे काय केले ते जाहीर करावे लागेल असे शिंदे गटाचे प्रवक्ते बंडखोर आमदार माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी कालच जाहीर केले होते, त्यामुळे आजच्या युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आपल्या सभेत काय उत्तर देतात याची उत्सुकता होती मात्र दीपक केसरकर यांचे नाव न घेता आमच्या पाठीत खंजीर खूपसून तुम्ही बाहेर पडलात,हिम्मत असेल तर राजीनामा द्यावा व निवडणुकीला सामोरे जा नंतर सत्य ,असत्य ,काय ते समजेल असे थेट आव्हानच आदित्य ठाकरे यांनी दिले शिवसेनेच्याआदित्य ठाकरे यांच्या या सभेला युवाई ची ताकद कमी तर ज्येष्ठांची संख्या जास्त दिसत होती, मात्र जिल्हाभरातून शिवसैनिक आणूनही हवे तसे शक्ती प्रदर्शन करण्यात शिवसेना अपयशी ठरली.
‌‌. राज्यात घडलेल्या सत्ता नाट्या नंतर शिवसेनेचे ४० बंडखोर आमदार शिवसेनेतून बाहेर पडले त्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर हे होते, मात्र याच दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीतून शिवसेना प्रवेश करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या दहशतवादाच्या विरोधात राष्ट्रवादी पाठिंबा देत नाही म्हणून बाहेर पडत नारायण राणे यांच्या विरोधात रान उठवले होते,व खासदार विनायक राऊत यांचा प्रचार केला होता,झं त्यावेळी खासदार विनायक राऊत मोठ्या फरकाने विजयी झाले होते व काही महिन्यातच दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता मात्र दीपक केसरकर यांच्याबरोबर राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करताना जे कार्यकर्ते आले ते आजही दीपक केसरकर यांच्याबरोबरच आहेत व सेनेतील काही पदाधिकारी ही दीपक केसरकर यांच्याबरोबर थांबले हे आजच्या सभेवरून दिसून आले आहे.
आजच्या सभेला जिल्हाभरातून आमदार दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात शक्ती प्रदर्शन करण्यासाठी शिवसैनिक आणले गेले होते,मात्र जेम तेम हजारच्या घरातच हा सर्व आकडा होता त्यामुळे केसरकर यांच्या मतदारसंघात केसरकारांना शह देण्याचे शिवसेनेचे मनसुबे धुळीस मिळतात की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे,कारण आज उंबरठ्यावर असलेले शिवसैनिक उद्या केसरकर यांना मंत्रिपद मिळाल्यावर केसरकर यांच्या गटात सामील झाले तर त्यात नवल वाटून घेण्यासारखे काही नसेल,कारण युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आजच्या दौऱ्याला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात हवी तशी युवाईची साथ मिळाली नाही हे आजच्या सभेवरून दिसून आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!