सावंतवाडी नगरपालिकेत भाजप रुपी बकासुराने कब्जा केला ..रुपेश राऊळ
नगरपालिकेच्या भूमिकेबाबत आता जनतेनेच विचार करणे गरजेचे.
सावंतवाडी :२५- येथील नगरपालिका ही बकासुराच्या यांच्या ताब्यात गेली आहे. त्यांनी कितीही खाल्ले तरी त्याचे पोट भरणार नाही. त्यामुळे या भाजप रुपी बकासुर आला कसे हद्दपार करायचे याचा जनतेने विचार करावा असे आवाहन सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत केले.
सावंतवाडीतील रवी जाधव यांचा स्टॉल कोणतीही पूर्वकल्पना न देता स्टाॅल हटविल्या वरून वादंग निर्माण झाला आहे. रवी जाधव यांच्या बाजूने शिवसेना, राष्ट्रवादी ,व्यापारी ठामपणे उभे आहेत,
गेले दोन दिवस त्यांनी नगरपालिके समोर ठिय्या आंदोलन करून ढोल बजाव आंदोलन केले. याबाबत पत्रकार परिषदेत शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी टार्गेट केले. व्यापाऱ्यांना कारवाई करायची असेल तर विश्वासात घेणे गरजेचे आहे तसे न करता घाईगडबडीत एखाद्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणे म्हणजे त्यांच्या तोंडचा घास हिरावून घेण्यासारखे आहे. नगराध्यक्ष संजू परब यांनी थोडे धीराने घ्यायला हवे होते मात्र तसे झाले नाही, आम्हाला कारवाईची भीती दाखविली जाते, गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे, त्यामुळे अशी कितीही धमक्यांना आम्ही भीक घालत नाही.अन्यायाच्या विरोधात आम्ही आवाज उठवत राहू असा इशारा यावेळी बोलताना रुपेश राऊळ यांनी दिला.
राष्ट्रवादी शिवसेना संयुक्त पत्रकार परिषदेत रुपेश राऊळ बोलत होते यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, नगरसेविका भारती मोरे, महिला आघाडी प्रमुख अपर्णा कोठावळे शब्बीर मणियार, प्रशांत कोठावळे नीता कविटकर दर्शना देसाई ,आशिष कदम ,नवल साटेलकर, अजित सांगेलकर, आदी उपस्थित होते.