या वयात बच्चूने कॅडबरीच खावी! दत्ता सामंतांची उंची तपासायला मंदार केणीना अजून खूप पावसाळे घालवावे लागतील
_*🛑 दत्ता सामंतांच्या कामाची उंची गाठणे मंदार केणी सोडाच,आमदार नाईकांनाही अशक्य! दत्ता सामंत यांच्या “तिखट मिरची” मुळे आमदारांना ते कोविड सेंटर उभे करावेच लागेल..*_
_*🛑 युवा मोर्चा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष राजवीर पाटील यांची सडकून टीका*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी, दि-२९ :-* शिवसेना पक्ष, शिवसेनेची नगरपालिका आणि आमदार वैभव नाईक हे सगळ्याच आघाडीवर अपयशी ठरले असून जनता आता यांची पोकळ बडबड ऐकून कंटाळली आहे. आपले अपयश लपवण्यासाठी चांगले काम करणाऱ्या भाजपावर आणि भाजपाच्या नेत्यांवर टीका करायची, सातत्याने राणेसाहेब, राणे परिवाराबद्दल बोलायचं एवढंच शिवसेना आणि नेत्यांचे काम आहे. दत्ता सामंत जे बोलले शब्दन शब्द खरे बोलले.त्याला उत्तरच देता येण्यासारखे नसल्याने आमदार वैभव नाईकांनी या “कॅडबरी बच्चू”ला पुढे करून दत्ता सामंत यांच्यावर टीका केली आहे. दत्ता सामंत स्वतःच्या पैशाने जे सामाजिक काम करत आहेत, ते आमदार वैभव नाईक यांना सत्ताधारी असूनही शासकीय निधीतून करता आलेलं नाही. कोणीही पुढे केलं तरी आपण काय बोलायचं हे मंदार केणी यांनी ठरवावे. उगाचच वैभव नाईकांची बाजू सावरण्यासाठी दत्ता सामंत यांच्यावर नाहक टीका करू नका.
कोरोनामुळे सगळ्याच पक्षाचे राजकीय पदाधिकारी आज मृत्यूमुखी पडत आहेत. आज राजकारण करण्याची वेळ नाही. नुसते पोकळ आश्वासन देऊन खूप दिवस झाले. जनतेला तुम्हीच आश्वासन दिलेले कोविड सेंटर कधी मिळणार हे विचारायचा नागरिक म्हणून प्रत्येकाचा हक्क आहे. दत्ता सामंत यांनी लोकप्रतिनिधी म्हणून जाब विचारला तर एवढं वाईट का वाटून घेतलं? आता दत्ता सामंत यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं म्हणून तरी ते सेंटर तुम्हाला आज उद्या सुरू करावेच लागेल. आणि त्याचा शुभारंभ भलेही आमदार करोत, ते क्रेडिट पण दत्ता सामंत यांच्याच पाठपुराव्याचा आहे, हेच सत्य असेल.
दत्ता सामंत यांची दखल राणेसाहेब घेत नसल्याने ते वैभव नाईक यांच्यावर टीका करतात .यासारखे दुसरे बालीश राजकीय स्टेटमेंट शोधून सापडणार. दत्ता सामंत आणि राणे यांचे हृदयाचे नाते आहे, ते तुम्ही आणि वैभव नाईक यांच्यासारखे टेंडरबेस नाते नाही. स्वतःच्या खिशात हात घालून काम करण्याचे नारायण राणे यांचे संस्कार दत्ता सामंत यांच्या नेतृत्वावर आहेत. तिथे दखल-बेदखलीचा संबंधच नाही. आपली दखल घेतली जावी आणि आपल्याला तालुका प्रमुख पद मिळावे यासाठी तुमची चाललेली ही शायनिंगगिरी सर्वांना माहीत आहे. कॅडबरी बच्चूला शिवसेनेत काय स्थान मिळावे हा शिवसैनिकांचा प्रश्न, आमचा नाही. पण दत्ता सामंतांची उंची गाठायला अजून पुष्कळ पावसाळे बघायचे आहेत, हे ध्यानात ठेवूनच पुढची वाटचाल केलीत तर चांगले एवढा एक चांगला सल्ला यानिमित्त द्यायला आवडेल, असे राजवीर पाटील यांनी म्हंटले आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FiUpx9Y03kdHjAHlJAYwkX
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

