गोव्याहून सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांचे बांदा टोल नाका येथे थर्मल स्कॅनिंग सुरू..
कार्यकारी संपादक- आनंद धोंड
सावंतवाडी:२५- आज सकाळी सात वाजल्यापासून सिंधुदुर्ग गोवा सीमेवर गोव्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांचे धर्मल स्कॅनिंग सुरू करण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
यामध्ये गोवा सिंधुदुर्ग सीमेवर महाराष्ट्र शासनाकडून आरोग्य, महसूल,व पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे.
मात्र स्थानिकांना यामधून सूट देण्यात आली आहे.