कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

शिवसेना माडखोल विभागाच्या वतीने घेण्यात आली गड संवर्धन मोहीम..

शिवसेना विभाग संघटक सुरेश शिर्के यांचा स्तुत्य उपक्रम..

कार्यकारी संपादक – आनंद धोंड

सावंतवाडी:३०- येथील शिरशिंगे सीमेलगत असलेल्या मनोहर मनसंतोष गडावर दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. मात्र पावसाळ्यात या गडावर जाण्यासाठी असणाऱ्या पाय वाटांवर मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली असतात, या सर्व बाबींचा विचार करून काल रविवारी शिवसेना माडखोल विभागाच्यावतीने गड संवर्धन मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेच्या अंतर्गत गडावरील परिसराची साफसफाई करण्यात आली. यामध्ये गडावरील शिवकालीन राजवाडा, विहीर, देवालय परिसर, तसेच गडाच्या तटबंदीचा परिसर ग्रास कटर च्या सहाय्याने साफ करण्यात आला. गडावर जाणाऱ्या पायवाटा खचल्या होत्या तिथे माती टाकून त्या दुरुस्ती करण्यात आल्या.
यावेळी माडखोल विभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊळ,विभाग संघटक माजी सरपंच सुरेश शिर्के,जीवन लाड शाखाप्रमुख संतोष चव्हाण, सांगेली शाखाप्रमुख राजन राऊळ, सुभाष रेमुळकर, सुभाष सुर्वे, वसंत शिर्के,उत्तम शिर्के,चंद्रकांत घावरे, रामचंद्र भिंगारे,रवि परब,श्रेयांक घावरे, नितेश घावरे, गोविंद लाड ,नाना घावरे, किशोर शिर्के,रवि शिर्के,प्रकाश घावरे, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!