कोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कर्नाटक राज्याचे ग्रामविकास मंत्री जे एस, विश्वर आप्पाजी यांची भाजप युवा नेते विशाल परब यांनी घेतली भेट

 

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 ब्यूरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,दि२८,: कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री जे. एस. विश्वर आप्पाजी यांची भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी बेंगलौर येथे भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक व विकासाच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपा बेळगावचे आमदार संजय पाटील उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा व बेळगाव यांची एक प्रकारे नाळ जुळलेली आहे. कर्नाटक राज्यातील बेळगावहून मोठ्या प्रमाणात भाजी सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वेंगुर्ला, मालवण, दोडामार्गसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होते. दिवसाला चार ते पाच ट्रक भाजी बेळगाव मधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत असते. जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बेळगांव च्या विविध भागातून भाजी व अन्य किराणामाल सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर येतो. श्री परब यांनी कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री जे. एस. विश्वर आप्पाजी यांचे गुलाबपुष्प देत स्वागत केले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्याचे आमंत्रण विशाल परब यांनी मंत्र्यांना दिले आहे.

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!